गोदिंया - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कारणाने मजूर आपापल्या गावी परत जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत आहेत. महाराष्ट्रामधून छत्तीसगडला निघालेल्या लोकांची तपासणी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेले मजूर मिळेल, त्या साधनाने आपापल्या गावी जात आहेत. अशा गावी जाणाऱ्या मजूरांची तपासणी गोंदिया जिल्ह्यात असलेल्या महाराष्ट्र-छत्तीगड सीमेवर करण्यात येत आहे. तपासणी करुन त्या मजूरांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी पाठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडमधून आलेल्या लोकांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.
दरम्यान, काही लोक चालत तर काही वाहनाच्या माध्यमातून आपल्या गावी निघाले आहेत. तर काहींनी ई पासही काढला आहे. या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. शासनाने छत्तीसगडला जाण्यासाठी मजूरांना मोफत बस सेवा सुरू केल्याचे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, बसची व्यवस्थाच नसल्याने मजूरांमधून संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा - दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात, सहकाऱ्यासोबत लाच स्वीकारताना रंगेहात अटक
हेही वाचा - चिंताजनक.. गोंदियात 24 तासात आढळले 26 कोरोनाबाधित रुग्ण, जिल्ह्याची संख्या २९ वर