गोंदिया - एकतर्फी प्रेमातून अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आरोपीने हातोड्याने वार करत ( girl killed by Hammer in Gondia ) निर्घृण हत्या केली. तर स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज ( २३ फेब्रुवारी ) सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास चिरामणटोला ( girl brutal killed in Chirmantola ) येथे घडली घडली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस स्टेशनच्या ( Ravanwadi police Gondia ) अंतर्गत येत असलेल्या चिरामणटोला येथे एकतर्फी प्रेमातून मुलीची ( one side love murder in Gondia ) हत्या करण्यात आलेली आहे. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले ( Durgaprasad Rahangadale ) २० वर्ष या आरोपीने १७ वर्षीय अकराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची हातोडीने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केली आहे.
हेही वाचा-Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक
विद्यार्थिनी ही ट्यूशनवरून घरी परत येत होती. विद्यार्थिनीची वाट बघत असेलेल्या आरोपी दुर्गाप्रसादने विद्यार्थिनीवर हातोडीने वार करून हत्या केली. आरोपी कित्येक वर्षांपासून प्रेमासाठी तगादा लावत होता. मात्र विद्यार्थिनीकडून या एकतर्फी प्रेमाला दुजोरा मिळत नसल्याने संतापलेल्या आरोपीने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर गावातील लोकांनी घेराव घातला आहे. लोकांचा जमाव पाहता आरोपीने स्वत:वर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला उपचारासाठी गोंदिया सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.