ETV Bharat / state

ST Worker Strike : कर्मचारी संपाचा फटका, गोंदिया एसटी आगाराचे साडेचार कोटींचे नुकसान; सर्वसामान्यांचे हाल

गेल्या ५८ दिवसांपासून गोंदिया आगाराची ( ST Worker Strike ) लालपरी ठप्प झाल्याने सुमारे साडेचार कोटी रुपयांचा फटका ( Gondia Bus Depot Loss ) आगाराला बसला असून गोंदिया आगारातून गेल्या ५८ दिवसांत एकही फेरी सुरू झाली नाही. शासनाने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली असून इतर मागण्यांवर सुद्धा सकारात्मक असताना संघटना विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

ST Worker Strike
ST Worker Strike
author img

By

Published : Dec 25, 2021, 5:39 PM IST

गोंदिया - गेल्या ५८ दिवसांपासून गोंदिया आगाराची ( ST Worker Strike ) लालपरी ठप्प झाल्याने सुमारे साडेचार कोटी रुपयांचा फटका ( Gondia Bus Depot Loss ) आगाराला बसला असून गोंदिया आगारातून गेल्या ५८ दिवसांत एकही फेरी सुरू झाली नाही. शासनाने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली असून इतर मागण्यांवर सुद्धा सकारात्मक असताना संघटना विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. परिणामी सर्वसामान्यांना प्रवास करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत गोंदिया आगारातील २२ कर्मचाऱ्यांना निलंबित ( Gondia ST Employees Suspend ) , तर १९ कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या ५८ दिवसांत जवळपास साडेचार कोटींचा तोटा सहन करवा लागला आहे.

संघटना विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम -

गेल्या ५८ दिवसांपासून गोंदिया आगाराची लालपरी ठप्प झाल्याने सुमारे साडेचार कोटी रूपयांचा फटका आगाराला बसला. अद्यापही एकही फेरी सुरू झाली नाही. शासनाने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली असून इतर मागण्यांवर सुद्धा सकारात्मक असताना संघटना विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. परिणामी सर्वसामान्यांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ८ नोव्हेंबरपासून राज्य कर्मचारी सेवेत विलीनीकरण करण्याच्या मुद्यावरून राज्य परिवहन महामंडहातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात गोंदिया आगारातील कर्मचारीदेखील सहभागी झाले आहेत. गोंदिया आगारात ८५ बसेस असून त्या १३ मार्गांवर धावतात. त्याकरिता ८५ वाहक आणि १२२ चालक कार्यरत आहेत. या फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला दिवसाला आठ ते नऊ लाख रूपयांची आवक होत होती. मात्र, गेल्या ५८ दिवसांपासून संप सुरू असल्याने एकही बस आगारातून सुटली नाही.

खासगी प्रवासी वाहतूक वाढली -

कोरोनाकाळानंतर आता कुठे शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटीची सेवा परवडणारी आणि सोयीस्कर होती. त्याचबरोबर शेतीचा हंगामदेखील संपला आहे. त्यामुळे मजूर वर्ग कामाच्या शोधात इतरत्र प्रवास करत आहेत. त्यांच्या हक्काची लालपरी अर्थात एसटी आता बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. लालपरीची चाके थांबल्याने त्याचा लाभ खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी घेतला आहे. सर्वच मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी कब्जा केला आहे. त्या मार्गावर एसटी सुरू झाल्यानंतर एसटीला आपले प्रवास परत मिळविताना मोठा त्रास करावा लागणार आहे.

२२ निलंबित, १९ बडतर्फ -

गोंदिया एसटी आगारात ८५ वाहक आणि १२२ चालक कार्यरत आहेत. त्यातील २२ जणांना निलंबीत करण्यात आले आहे. तर वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणो १९ जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. शासन वारंवार आवाहनकरून देखील कर्मचारी आपल्या मागणी ठाम आहेत. अशीच तणावाची स्थिती राहिल्यास आणि शासनाने कठोर भुमिका घेतल्यास कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याचीदेखील वेळ येवू शकते.

एकच बस धावली -

गोंदिया आगारात ८५ बसेस आहेत. मात्र, कर्मचारी संपावर असल्याने त्या एसटी बसेसची चाके थांबलेली आहेत. भंडारा आगारातील काही कर्मचारी कामावर परतले. त्यामुळे काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या. भंडारा आगराची एक बस गोंदियापर्यंत धावत असून त्या माध्यमातून प्रवाशांना ये-जा करण्यास साधन उपलब्ध झाले आहे, अशी माहिती आगार प्रमुख संजना पटले यांनी दिली आहे.

हेही वाचा - Auction of Nirav Modi Property : नीरव मोदीच्या 'या' संपत्तीचा होणार लिलाव; ईडीची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.