गोंदिया - आधीच जनता लॉकडाऊनला कंटाळली असताना पुन्हा लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. राज्यात पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही.त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा - दीपाली चव्हाणचे आणखी एका पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट
राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून गंभीर रूप धारण करत आहे.गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली होती. सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लॉकडाऊनला जाहीरपणे विरोध दर्शवण्यात आला आहे.लोकांनी नियम पाळल्यास लॉकडाऊन टाळता येऊ शकते, असेही पटेलांनी नमूद करीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.लॉकडाऊनला आतापासूनच विरोध होत असून,यामुळे नव्या वादाला तोंड फुटेल असे दिसत आहे.