गोंदिया - नागझिरा व कोका अभयारण्यालगत असलेल्या तिरोडा तालुक्यात येणार्या ग्राम नवेझरी येथे बिबट्याने मागील 2 महिन्यापासून धुमाकूळ घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या बिबट्याने रामकृष्ण जगन्नाथ निमजे यांच्या घरात शिरून शेळीला ठार केले, तर नामदेव उके (रा. नवेझरी ) या व्यक्तिला जखमी केले आहे. ही घटना बुधवार 2 जूनच्या रात्री घडली आहे.
अशी घडली घटना
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणारा नागझिरा व कोका अभयारण्यालगत तिरोडा तालुक्यातील नवेझरी हे एक गाव आहे. अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात हे वन्यप्राणी लगतच्या गावांकडे धाव घेतात. जंगल परिसरातील नवझेरी येथे बिबट्याने दोन महिण्यापासून मोठा धुमाकूळ घातला आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास रामकृष्ण निमजे यांच्या घरी घुसून बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. शेळीची ओरडा होताच त्यांच्या घरासमोर राहणारे नामदेव शिवरू उके घराच्या बाजूला लघुशंकेसाठी गेले होते. नेमक्या त्याचवेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेहऱ्यावर पंजा मारून जखमी केले आहे. वन विभागाचे बिट गार्ड कडवे यांना फोनद्यावरे या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र ते रात्री आले नाही. तसेच वन विभागाचे कर्मचारी रात्रीपाळीची ड्यूटी, पेट्रोलिंगसुद्धा करीत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. जगंलातील वनतळी, हँडपंप, सौरऊर्जेवर चालणारे उपकरणे बंद असल्याने पाणी पिण्यासाठी वन्य प्राणी गावांकडे येत आहे. याकडे वन अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे नवेझरी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दर दोन-चार दिवसांत या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे बोलल्या जात आहे.
हेही वाचा-ताडोबात चवताळलेल्या वाघाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर केला हल्ला, जीव वाचवण्यासाठी वाघाशी झटापट