ETV Bharat / state

गोंदियात शंभरपेक्षा जास्त परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन - Government Medical College, Gondia

गोंदियाच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात बूधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. रुग्णांची हेळसांड होऊ नये, याची काळजी आम्हाला असली तरी, शासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन नाईलाजाने करावे लागत असल्याचे या परिचरिकांचे म्हणणे आहे.

परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन
परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन
author img

By

Published : Jun 24, 2021, 12:24 PM IST

Updated : Jun 24, 2021, 12:30 PM IST

गोंदिया :- राज्य परिचारिका संघटनेने बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोविड प्रार्दुभावात काम केल्याचा जोखीम भत्ता मिळावा, केंद्राप्रमाणे वेतन द्यावे, नवी पदभरती करावी, तसेच कोविड प्रार्दुभावात काम करतांना दगावलेल्या परिचारिकांना शासनाकडून ५० लाखांची मदत मिळावी, या मागण्यांसाठी गोंदियाच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. १०० पेक्षा जास्त परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य अधिपरिचारिका संघटनेकडून २१ व २२ जून रोजी २-२ तासांचे सांकेतिक आंदोलन करण्यात आले. तसेच बुधवारपासून संपूर्ण वेळ बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे.

परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन

या आहेत मागण्या

यामध्ये १०० टक्के पदभरती, १०० टक्के प्रमोशन, राज्यात केंद्र शासनाच्या धर्तीवर नर्सिंग भत्ता देणे, कोविड काळात ७ दिवसांचा कर्तव्य काळ व ३ दिवसांची अतिरिक्त सुट्टी देणे, केंद्र सरकार प्रमाणे पद नावात बदल करणे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर नियमबाह्य निलंबन व कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे व इतर मागण्याचा समावेश आहे.

आंदोलनामुळे रुग्णांच्या अडचणीत वाढ

या आंदोलनामुळे रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सद्यास्थितीत एकही परिचारिका रुग्णसेवेत नसल्याने, ऐन कोविड काळात मोठी समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांची हेळसांड होऊ नये, याची काळजी असली तरी, शासनाला जाग येत नसल्याने हे आंदोलन नाईलाजाने करावे लागत असल्याचे या परिचरिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मागण्या शासन दरबारी मांडत आहोत. पण त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या परिचारिकांनी केला आहे.

हेही वाचा - धुळ्यात शुक्रवारपासून परिचारिका संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा

Last Updated : Jun 24, 2021, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.