ETV Bharat / state

विहीरीत पडलेल्या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या कामगाराचा मृत्यू - gondia crime news

फत्तेपुर येथील फार्म हाउसच्या विहीरी जवळ चरत असलेली शेळी अचानक विहीरीत पडल्याने तीला वाचवण्यासाठी फार्महाउसची देखरेख करणारा कामगार गेला असता त्याचाही विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गोंदिया तालुक्यात घडली असून गंगाझरी पोलीस पूढील चौकशी करत आहेत.

विहीरीत पडलेल्या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : Aug 9, 2019, 12:55 PM IST

गोंदिया - फत्तेपुर येथील फार्म हाउसच्या विहीरी जवळ चरत असलेली शेळी अचानक विहीरीत पडल्याने तीला वाचवण्यासाठी फार्महाउसची देखरेख करणारा कामगार गेला असता त्याचाही विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गोंदिया तालुक्यात घडली असून गंगाझरी पोलीस पूढील चौकशी करत आहेत.

भारत पुराम (वय ४१ रा.फत्तेपुर) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना दिली असता, घटनास्थळी गंगाझरी पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिम ने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी दोरीच्या सहाय्याने विहीरीमध्ये दिवा उतरविले असता तो दिवा विझला. त्यामुळे विहीरीमध्ये विषारी वायु असल्याचा अंदाज लावल्यानंतर खाटेच्या चारही बाजुला दोरीने बांधुन खाट विहीरीमध्ये टाकून मृतदेह खाटेच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला तसेच शेळीला लोखंडी गळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असुन गंगाझरी पोलिसांनी पंचनामा केला आहे. कामगाराचा मृत्यु कसा झाला? याचा तपास सुरु केला असुन गंगाझरी पोलिसांनी सध्या त्याची आकस्मीक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No :- 9823953395
Date :- 08-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_08.aug.19_01_death_7204243
विहिरीत पडल्या बकरीला वाचविण्या साठी गेलेल्या इसमाचा विहिरीत मृत्यु
Anchor :- गोंदिया तालुक्यातील गंगाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या फत्तेपुर येथे एका फार्म हाउसच्या विहीरी जवळ चरत असलेली बकरी अचानक विहीरीत पडल्याने याची माहिती फार्महाउस ची देखरेख करणा-या भारत पुराम वय ४१ रा. फत्तेपुर याला मिळताच कोणता ही विचार न करता भारत हा विहीरीत पडलेल्या बकरीला वाचविण्यासाठी विहिरीत उतरला असतांना अचानक बेशुध्द होउन विहीरीत पडला. या घटनेची माहिती परिसरातील लोकांनी पोलिसांना देण्यात आली असता घटनास्थळी गंगाझरी पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिम ने घटनास्थळी पोहोचून दोरीच्या सहाय्याने विहीरीमध्ये दिवा उतरविले असता तो दिवा विझला. त्यामुळे विहीरी मध्ये विषारी वायु असल्याचा अंदाज लावल्या नंतर खाटेच्या चारही बाजुला दोरीने बांधुन खाट विहीरीमध्ये टाकून मृतदेह खाटेच्या सायाने बाहेर काढण्यात आले तसेच मृत बकरीला लोखंडी गळ च्या माध्यमातुन बाहेर काढण्यात आला असुन भारत चा मृत देह छविच्छेदना साठी पाठविण्यात आले असुन गंगाझरी पोलिसांनी पंचनामा करत भारत ची मृत्यु कशी झाली याचा तपास सुरु केला असुन गंगाझरी पोलिसांनी सध्या आकस्मीक मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे.Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.