ETV Bharat / state

गोंदियातील युरिया खताची मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवैध विक्री; चौकशीची मागणी - गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा या तालुक्यातुन युरिया खत मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जात असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सीमा तपासणी नाक्यावर वॉच ठेवण्याबाबतचे पत्र पोलीस विभागाला दिल्याची माहिती आहे. तसेच युरिया खताची मूळ किंमत २६७ रुपये असताना वाढीव किमतीने होणारी विक्री थांबविण्याचे कृषी विभागाला मोठे आवाहन आहे.

यूरिया खताची अवैध विक्री
यूरिया खताची अवैध विक्री
author img

By

Published : Aug 27, 2021, 7:00 AM IST

गोंदिया - धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यात युरिया खताची टंचाई जाणवत आहे. कृषी विभागाने स्टॉकमध्ये ठेवलेला युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला असला तरी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याच्या सीमेला लागून असलेल्या आमगाव, सालेकसा आणि देवरी या तीन तालुक्यातून युरिया खताची अवैध विक्री केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने पोलीस अधीक्षकांना पत्र देत दोन्ही राज्याच्या सीमेवरील पोलीस चौकीवर परराज्यात जाणाऱ्या खतांची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

गोंदियातील युरिया खताची मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवैध विक्री

कृषी केंद्रांना नोटीस

केंद्र सरकारतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खताचा पुरवठा केला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील जुलै महिन्यात २५०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध करून देण्यात आला. या युरिया खताचे वाटप आठही तालुक्यात करण्यात आले. तर ऑगस्ट महिन्यात १९८० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध झाला असून या खताची सुरक्षितता म्हणून त्याची कृषी विभागाने साठवणूक करून ठेवली होती. मात्र जिल्ह्यात पुन्हा खताची टंचाई भासत असल्याने हा साठा देखील कृषी केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना विक्री करण्यात आला. शेतकऱ्यांना खताची विक्री करताना त्यांची ऑनलाईन नोंदणी करावी अशी सूचना असताना सुद्धा जिल्ह्यातील ५ कृषी केंद्राने ऑफलाईन पद्धतीने खताची विक्री केल्याने त्या ५ कृषी केंद्रांना नोटीस देखील कृषी विभागाद्वारे देण्यात आली आहे.

यूरिया खताची अवैध विक्री
यूरिया खताची अवैध विक्री

चढ्या दरानं विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.