ETV Bharat / state

अवैध दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त - gondia crime news

गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार गावात अवैध ब्रँडेड कंपनीच्या देशी-विदेशी दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग
अवैध दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Aug 5, 2020, 12:54 PM IST

गोंदिया - गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार गावात अवैध ब्रँडेड कंपनीच्या देशी-विदेशी दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. सपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधपणे दारू तयार करण्यात येत होती.

या माहितीच्या आधारे राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या गोंदिया, देवरी व सीमा तपासनी नाका, देवरी व त्यांच्या स्टाफच्या सहकार्याने मुंडीपार येथील दोन घरांवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी देशी-विदेशी ब्रँडची मद्यनिर्मिती होत असल्याचे निषपन्न झाले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ घर मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.