ETV Bharat / state

किराणा दुकानदाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार - गोंदिया बातम्या

मुलीच्या आईने तिला शॅम्पू आणि काही वस्तू आणण्यासाठी दुकानला जाण्यास सांगितले. दुकानदार अक्षय या नराधमाने ती एकटी असल्याचे पाहून आपल्या घरात बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

गोंदिया
गोंदिया
author img

By

Published : Oct 16, 2020, 6:46 PM IST

गोंदिया - सामान खरेदीसाठी आलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दुकानदाराने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी अक्षय मनोहर वैघे (वय 22) याला अटक केली आहे.

संबंधित मुलीच्या कुटुंबातील एका महिलेचे निधन झाले होते. घरातील सर्वजण अंत्यविधीसाठी गेले असताना मुलीच्या आईने तिला शॅम्पू आणि काही वस्तू आणण्यासाठी दुकानला जाण्यास सांगितले. दुकानदार अक्षय या नराधमाने ती एकटी असल्याचे पाहून आपल्या घरात बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. बराच वेळ झाला तरी मुलगी परत न आल्याने तिच्या आईने दुकानात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित दुकान त्यांना बंद दिसले. त्यावर त्यांनी इतर दुकानांमध्ये चौकशी केली तरी मुलगी सापडली नाही. त्यानंतर दुकानदाराच्या घराचे दार उघडे दिसले आणि ही मुलगी तिथे असल्याचे त्यांनी पाहिले. तिला जवळ घेऊन चौकशी केली असता मुलगीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवत नराधम दुकानदारास अटक केली.

भा.द.वि कलम 376 (3) अ, ब, 4, 6 पॉक्सो 376 अतंर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तपास पोलीस निरीक्षक उदभव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन ढोके करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.