ETV Bharat / state

#COVID 19 : बाहेरुन स्वगावी आलेल्यांना देता येणार घर बसल्या वेबसाईटद्वारे माहिती

बाहेरुन प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी वैद्यकीय तपासासाठी माहिती द्यावी, यासाठी गोरेगाव नगरपंचायतीने एक वेबसाईट तयार केली आहे. यात माहिती भरल्यानंतर वैद्यकीय पथक घरी जावून तपासणी करत आहेत.

वेबसाईट
वेबसाईट
author img

By

Published : Mar 26, 2020, 7:50 AM IST

Updated : Mar 26, 2020, 7:44 PM IST

गोंदिया - कोरोना गावात पसरु नये म्हणून गोरेगाव नगरपंचायतीने बाहेर गावातून आलेल्यांनी घरी बसून माहिती द्यावी, यासाठी एक वेब लिंक तयार केली आहे. यावर 30 हून अधिक लोकांनी घरी बसून माहिती दिली. यावरून त्यांची घरबसल्या आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

बाहेरुन स्वगावी आलेल्यांना देता येणार घर बसल्या वेबसाईटद्वारे माहिती

देशात सध्या कोरोनाने थैमान घातला असून 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करत लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. तसेच विदेशातून देशात व एका गावाहून दुसऱ्या गावी परतणाऱ्यांना आरोग्य तपासणी करा, अशी विनंतीही केली होती. यावरून गोरेगाव नगर पंचायतीचे नागराध्यक्ष आशिष बारेवार यांनी नागरिकांना घराबाहेर न पडता माहिती देता यावी यासाठी लिंक तयार केली. या लिंकमध्ये नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोठून आला, कधी आला, आजारासंबंधी माहिती, होम क्वारंटाईनच्या शिक्क्याबद्दल माहिती भरता येत आहेत.

ही माहिती नगरपंचायत गोळा करून तहसीलदारांमार्फत तालुका आरोग्य यंत्रणेला देण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेला ही माहिती मिळताच तासाभरात वैद्यकीय पथक त्यांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत. त्यांना जर काही लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्यात येत आहे. गरज असल्यास होम क्वारंटाईनचे शिक्के मारुन घरीच राहण्याचा सल्लाही दिला जात आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन : स्वागत समारंभासाठी ते सर्वजण जेवण बनवत होते; पोलिसांनी दाखवल्या खाक्या..

Last Updated : Mar 26, 2020, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.