ETV Bharat / state

दारू बंदी असलेल्या गोंदियात दारू वाहतूक सुरूच; 57 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 57 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही ८ ऑक्टबर गुरूवारी करण्यात आली.

57 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त
57 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Oct 10, 2020, 12:36 AM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 57 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही ८ ऑक्टबर गुरूवारी करण्यात आली.

अर्जुनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. अर्जुनी तालुक्यातील बोरी ते महागाव मार्गावर अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रस्त्यावर पाळत ठेवली. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगावकडे जाणाऱ्या टी पॉईंटवर विना नंबरची एक होंडा कंपनीची ॲक्टिवा मोटरसायकल दोन व्यक्ती घेवून जाताना दिसले. त्यांच्यासोबत प्लास्टिकची पोथळी होती. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासले. प्लास्टिक पोथळी मध्ये 5 हजार 640 रुपये किमतीचे 290 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून मोटार सायकलसहीत एकुण 57 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी महेंद्र सदाशिव वैद्य आणि लेमराव केशव रामटेके दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव चोप येथील रहिवासी आहे. त्यांच्या विरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अर्जुनी पोलीस करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.