गोंदिया- बैल पोळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या 'सर्जा राजा'ची पूजा करून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी ग्रामीण भागात झडत्यांचा(स्थानिक गीतांचा) सूर निनादला. बैलांच्या पूजेसह शेतकऱ्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी बैलांना सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
झडत्यांमध्ये शेतकऱ्यांची व्यथा, देशातील ज्वलंत समस्या, महागाई, भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, देशप्रेम अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. आजच्या यांत्रिक शेतीत बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली असली, तरीही शेतकऱ्यांमध्ये बैलांप्रती तेवढीच श्रद्धा, आदर, प्रेम आणि आपुलकी दिसून आल्याचे बैलपोळ्यात पाहायला मिळाले.
हेही वाचा यंदाचा पोळा अन् दारू सोडा, गडचिरोली जिल्ह्यात 'मुक्तीपथ'कडून जनजागृती