गोंदिया - संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. देशात, राज्यात आणि जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला आहे. जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती या विषाणूने बाधित होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी घरपोच सेवेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्यामार्फत 24 तास नियंत्रण कक्ष व व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना - जिल्हाधिकारी बलकवडे
जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती या विषाणूने बाधित होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.