ETV Bharat / state

Local Body Elections Gondia : उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

author img

By

Published : Dec 20, 2021, 9:12 PM IST

उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ( Gondia District Administration ) झाले आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर आज ( सोमवारी ) रवाना झाले आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी, ८ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी आणि ३ नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी मतदान होणार आहे.

कर्मचारी
कर्मचारी

गोंदिया - जिल्ह्यात उद्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची ( Local Body Elections Gondia ) तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली ( Gondia District Administration ) आहे. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर आज (सोमवारी) पाठविण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या सालेकसा, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी आणि देवरी या चार तालुक्यात मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर गोंदिया, आमगाव, तिरोडा आणि गोरेगाव या चार तालुक्यात सकाळी ७.३० ते ५ वाजेपर्यंत वेळ रहाणार आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी

८ लाख ३८ हजार ९७७ मतदार बजावणार आपला हक्क

उद्या ( मंगळवारी ) होणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी, ८ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी आणि ३ नगर पंचायतीच्या ४५ जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी ८ लाख ३८ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी १ हजार ३७५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

तालुक्यानुसार मतदान केंद्र

जिल्ह्यात १ हजार ३७५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३८०, गोरेगाव १४६, सालेकसा १३६, देवरी १२६, तिरोडा १९५, आमगाव ११९, सडक-अर्जुनी १३१ अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १६५ केंद्रांचा समावेश आहे.

अशी आहे कर्मचाऱ्यांची आकडेवारी

जिल्ह्यातील १ हजार ३७५ मतदान केंद्रावर ६ हजार ६८ कर्मचारी-अधिकारी नेमण्यात आले आहेत. ४ हजार ८ पोलीस कर्मचारी १ हजार ८० होमगार्ड तर १९३ पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणी १९ जानेवारीला

जिल्ह्यातील ४३ गट व ८६ गणांची निवडणूक होत आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक १० गट व २० गणांचा निवडणूक कार्यक्रमानुसार जाहीर झाला आहे. पहिल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २२ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र, मतमोजणी प्रकिया रद्द करण्यात आली असून ओबीसी जागेवर खुल्या प्रवर्गातील निवडणूक मतदान १८ जानेवारीला होणार असून दोन्ही कार्यक्रमांच्या मतदान पक्रीयेनंतर १९ जानेवारी मतमोजणी होणार आहे.

हे ही वाचा - Local Body Elections Gondia : निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; 21 डिसेंबरला मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.