ETV Bharat / state

गोंदियात भाजपकडून वीज बिलाची होळी, सरकारविरोधात निदर्शने

author img

By

Published : Jul 23, 2020, 1:36 AM IST

टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी तिरोडा तालुक्यात बुधवारी भारतीय जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आले.

gondia bjp agitation against govt due electricity bill hike
गोंदियात भाजपकडून वीज बिलाची होळी

गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात लॉकडाऊनच्या दरम्यान ३ महिन्याचा कालावधीचे रिडींग न घेता महावितरण कंपनीने मनमर्जीने बिल पाठवले. सदर बिल माफ करण्यात यावेत. तसेच अवाजवी रिडींग दुरूस्त करण्यात यावी, या मागणीसाठी आज (बुधवार दि. २२ जुलै) रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय तीरोडा येथे बीज बिलाची होळी करण्यात आली.

गोंदियात भाजपकडून वीज बिलाची होळी

हेही वाचा - विरोधी पक्षनेत्यांचे दौरे, बैठकांना हजर राहण्यास सरकारी अधिकाऱ्यांना मनाई

कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, रेती घाटाचे लिलाव करण्यात यावे व घरकुल बांधकाम, इतर बांधकामाकरीता लागणारी रेती माफक दरात पुरविण्यात यावी, शेतक-यांचे धानाचे चुकारे व बोनस तत्काळ जमा करण्यात यावे, ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाना मुदतवाढ देण्यात यावी, अशा विविध मागण्यांना घेऊन भाजपतर्फे आज उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.

दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतच असून नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे गरजेचे असताना, आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मात्र हे सर्व नियम धुळीला मिळवल्याचे पाहयला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.