ETV Bharat / state

Gondia Car Accident : कार अपघातात चार मित्रांचा मृत्यू; खोबा गावाजवळील घटना - खोबा गाव कार अपघात

खोबा गावाजवळ काल मध्य रात्री झालेल्या अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे चारही तरुण आमगाव तालुक्यातील आहेत. आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी एका चार चाकी वाहनाने ( 4 youths kills Car accident Gondia ) गेले होते. सोलर फिटींगचे कामे आटपून हे पाच तरुण रात्री परत येत असताना अचानक गाडी अनियंत्रित झाल्याने अपघात होवून चार तरुणांचा मृत्यू झाला.

कार अपघात
कार अपघात
author img

By

Published : Jul 28, 2022, 5:54 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ काल मध्य रात्री झालेल्या अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे चारही तरुण आमगाव तालुक्यातील आहेत. आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी एका चार चाकी वाहनाने ( 4 youths kills Car accident Gondia ) गेले होते. सोलर फिटींगचे कामे आटपून हे पाच तरुण रात्री परत येत असताना अचानक गाडी अनियंत्रित झाल्याने अपघात होवून चार तरुणांचा मृत्यू झाला. तर जण गंभीर जखमी झाला आहे.

अशी आहेत तरुणांची नावे : प्रदीप बिसेन ( 24 ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर रामकृष्ण बिसेन, सचिन कटरे, संदीप सोनवाने, निलेश तुरकर असे मृतकांची नावे आहेत. यातील जखमीवर गोंदियातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर चारही मृतदेह डूगिपार पोलिसांनी नवेगाबांध येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.

हेही वाचा - Thane Crime : भिवंडीत पोलिसांनी ९ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत १६ गुन्ह्यांची केली उकल; लाखोंचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.