ETV Bharat / state

गोंदिया : नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगलात आग, 3 ठार - fire at nagzira tigre reserve

थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत.

गोंदिया : नागझिरा व्याघ्र प्रकलपातील जंगलात आग, 3 ठार

author img

By

Published : Apr 9, 2021, 9:34 AM IST

Updated : Apr 9, 2021, 1:58 PM IST

गोंदिया : जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पीटेझरी गेटला लागुन असलेल्या थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत. या मजुरांवर नागपूर येथे ऊपचार सुरु आहेत.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या थाटेझरी गावातील जंगलात गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली. यावेळी जंगलात काम करणाऱ्या तीन हंगामी मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी बोलाविलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाचाही स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे गाव नागझिरा व्याघ्र प्रकलपाच्या कोर क्षेत्रात असल्याने वन्य जीवांनाही या आगीचा फटका बसून अनेक वन्य प्राणीही दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मृतांमध्ये २४ वर्षीय राकेश मडावी, ४५ वर्षीय रेकचंद राने, २२ वर्षीय सचिन श्रीरगे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ४२ वर्षीय विजय मरसकोल्हे आणि २५ वर्षीय राजेश हराम यांचा समावेश आहे.

मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत

या घटनेत मृत पावलेल्या मजुरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर आगीत जखमी झालेल्या मजुरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - सीबीआय चौकशी सुरूच राहणार, अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Last Updated : Apr 9, 2021, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.