ETV Bharat / state

सावधान...वाहनातून अतिरिक्त वाहतूक केल्यास भरावा लागणार दंड - अतिरिक्त प्रवासी वाहतूक दंड

गोंदिया प्रशासनाच्या या निर्णंयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गोंदियात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत.

gondia
वाहनातून अतिरिक्त वाहतूक केल्यास भरावा लागणार दंड
author img

By

Published : Jun 3, 2020, 7:32 PM IST

गोंदिया - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांसाठी अतिरिक्त प्रवासी वाहतूक करू नये, असे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने दुचाकीवर एक, तीनचाकी वर ३, चारचाकी वर ३ व्यक्ती प्रवास करू शकतात. याचे उल्लंघन केल्यास दुचाकी चालकाला २००, तर तीन व चार चाकी वाहनाला ५०० रुपये दंड तर दुसऱयांदा उल्लंघन केल्यास दुचाकीला ५०० व चार चाकी व तीन चाकीला हजार रुपये दंड व त्यानंतर आढळल्यास फौजदारी गुन्हा, अशा स्वरुपाचे आदेश उपविभागीय अधिकाऱयांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासुन सुरू झाली आहे.

वंदना सवरंगपते (उपविभागीय अधिकारी, गोंदिया)

ग्रीन झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात फक्त १५ दिवसात कोरोनाचे तब्बल ६९ रुग्ण मिळाल्याने आता पुन्हा कोरोनाचा कोणालाही संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाद्वारे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात दुचाकीवर फक्त एका व्यक्तीने प्रवास करावा व तीन चाकी व चार चाकीमध्ये ३ लोकांनीच प्रवास करावा असे त्यात नमुद करण्यात आले आहे. जर दुचाकीवर दोघे जण दिसल्यास त्या दुचाकीवर 200 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर, तीन व चार चाकी वर पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

washim
वाहनातून अतिरिक्त वाहतूक केल्यास भरावा लागणार दंड

गोंदिया प्रशासनाच्या या निर्णंयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गोंदियात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे दुचाकीतून डबल सीट फिरवल्यानेसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून दुचाकीने डबल सीट फिरणाऱ्यांवर वचक बसावी म्हणून दंड घेण्यात येत आहे. तर, दुसऱयांदा उल्लंघन केल्यास दुचाकीला ५०० व चार चाकी व तीन चाकीला हजार रुपये दंड व त्यानंतर आढळल्यास फौजदारी गुन्हा अशा स्वरुपाचे आदेश उपविभागीय अधिकाऱयांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासुन सुरू झाली आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत कोणी मोटरसायकलवर डबल सीट जात आहे, तर त्यांना सोडण्याचा अधिकार पोलिसांना असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.