ETV Bharat / state

Vidarbha Irrigation Area Reduced : महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टी मात्र, विदर्भात सिंचन क्षेत्र घटले

यंदाच्या वर्षी राज्यभरात अतिवृष्टी झाली. असे असले तरी विदर्भाच्या सिंचन क्षेत्रात घट झाल्याचे समोर आले ( Vidarbha Irrigation Area Reduced ) आहे. सिंचन क्षेत्रात घट दिसून येत असल्याने चिंतेची बाब आहे.

महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टी मात्र, विदर्भात सिंचन क्षेत्र घटले

author img

By

Published : Feb 2, 2022, 8:57 PM IST

गोंदिया : महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टी झाली असली तरी, विदर्भातील सिंचन क्षेत्रात मात्र घट झाली ( Vidarbha Irrigation Area Reduced ) आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याचा विचार केला, तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गोंदिया जिल्यातील धरणांच्या पाणी साठ्यात कमी झाली आहे. गोंदियात ९ हजार ८५४ हेक्टर शेत जमिनीला पुरेल इतकाच पाणी साठा उपलब्ध असल्याने सिंचन क्षेत्रात घट झाली आहे. काय आहे गोंदिया जिल्ह्यातील पाणी परिस्थिती, पाहूया एक रिपोर्ट..

महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टी मात्र, विदर्भात सिंचन क्षेत्र घटले
  • तीन धरण, एक जलाशय

गोंदिया जिल्ह्यात तीन मोठे धरण ( Dams In Gondia District ) असून, एक मोठे जलाशय आहे. दरवर्षी याच धरणातून सिंचनाकरिता पाणी पुरवठा केला जातो. यात पुजारीटोला धरण ( Pujaritola Dam ), कालीसराळ धरण ( Kalisaral Dam ) , शिरपूर धरण ( Shirpur Dam ) आणि इटियाडोह जलाशय याचा समावेश आहे. यावर्षी गोंदिया जिल्ह्याच्या चारही मोठ्या जलश्रोतातून ९ हजार ८५४ हेक्टर शेतजमिनीसाठी पाणी दिले जात आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात समाधनकारक पाऊस पडला असला तरी जिल्ह्यातील मुख्य जलाशय १०० टक्के भरू शकले नसल्याने यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत सिंचन क्षेत्रात मात्र घट झाली आहे.

  • मध्यप्रदेश राज्याला २५ टक्के पाणी

गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता, दरवर्षी खरीप हंगामात १ लक्ष ६० हजार हेक्टर शेतजमिनीवर धान पिकाची लागवड केली जाते. तर रब्बी हंगामात धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यानुसार दरवर्षी १५ हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी दिले जाते. तरी मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याने यावर्षी या शेतकऱ्याच्या आनंदावर विजर्न पडले आहे. तर विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांपैकी शिरपूर आणि कालीसराळ धरण हे दोन धरणे आंतरराज्य धरण असल्याने महाराष्ट्राला या धरणाचे ७५ टक्के तर मध्यप्रदेश राज्याला २५ टक्के पाणी शेती आणि पिण्याकरिता दिले जाते. तर गोंदिया जिल्ह्याच्या इटियाडोह जलाशयातून गोंदिया जिल्ह्यासह शेजारच्या भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यालादेखील याच धरणातून शेतीकरिता पाणी दिले जाते.

  • गोंदिया जिल्ह्यातील तीन धरणसाठ्यात उपलब्ध जलसाठा

महाराष्ट्र राज्याला मिळणारे पाणी ७५ %

मध्यप्रदेश राज्याला मिळणारे पाणी २५ %

  • उपलब्ध साठा गोंदिया जिल्हा

पुजारीटोला धरण :- ५७.६१ %

कालीसराळ धरण :- ४७.४४ %

शिरपूर धरण :- ८२. ३४ %

इटियाडोह जलाशय ५७ .६१ %

  • तालुका निहाय हेक्टरी लगावट क्षेत्र

गोंदिया तालुका १२२७ हेक्टर

आमगाव तालुका १०३६ हेक्टर

सालेकसा तालुका ६९१ हेक्टर

  • इटियाडोह धरणातून मिळणारे पाणी

अर्जुनी मोरगाव तालुका गोंदिया जिल्हा २२४० हेक्टर

भंडारा जिल्याला मिळणारा पाणी १६०० हेक्टर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.