गोंदिया - रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैध व्यवसाय करणार्या आरोपीला गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवार 17 मे रोजी करण्यात आली. देवेंद्र रामनाथ पंचवारे (30) रा. हिर्री, असे आरोपीचे नाव आहे.
गोंदिया रेल्वे पोलिसांची कारवाई -
देवेंद्र पंचवारे हा वेगवेगळ्या 4 पर्सनल आयडीने रेल्वे आरक्षित ई-तिकीट बनवून अवैध व्यवसाय करीत असल्याची गोपनीय माहिती गोंदिया रेल्वे दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी रेल्वे ई-तिकिटांचा अवैध व्यवसाय करणार्या बालाघाट जिल्ह्याच्या हिर्री येथील देवेंद्र रामनाथ पंचवारे याला अटक केली. तसेच पुढील कारवाईसाठी आरोपीला बालाघाट येथील रेल्वे सुरक्षा दलाला ताब्यात दिले. त्याच्यावर रेल्वे अधिनियमाच्या कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होता. त्याने 26 हजार 336 रुपयांच्या 24 ई-तिकीट बनविल्या होत्या. तसेच लाभ मिळवून घेण्यासाठी प्रती तिकीट 50 ते 100 रुपये अतिरिक्त भाडे घेऊन ग्राहकांना उपलब्ध करून देत होता.