गोंदिया - दिवाळी म्हटले की नवीन कपडे, गोड खाद्य पदार्थ सर्वांच्या चवीला येतात. मात्र, राज्यात आजही काही गावे अशी आहेत. ज्या गावातील लोकांना दिवाळीच्या सणात जेवणाच्या ताटात देखील गोड खाद्य पदार्थ पडत नाहीत. त्यामुळे आदिवासी भागातील लोकांना देखील फराळाचा आस्वाद घेता यावा आणि दिवाळी निमित्त नवीन कपडे घालता यावेत, या उद्देशाने नागपुरातील सेवा भावी संस्थांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील गावात 'दिवाळी मिलन' समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या गावात जायला साधा रस्ता नाही. नदी नाले पार करून जावे लागते, अशा गावात सेवा भावी संस्थानसोबत ईटीव्ही भारतही पोलिसांच्या मदतीने पोहोचली.
गोंदिया जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त देवरी तालुक्याच्या शसस्त्र पोलीस दूरक्षेत्र बोनडे अंतर्गत येणारा कडूझरी गाव हे अतिशय घनदाट जंगलात आहे. चारही बाजूला जंगलातून जायला साधा रस्ताही नाही. गावाच्या टोकावर वाहणारा नाला पार करून जावे लागते. या गावकऱ्यांकरिता श्रापचं म्हणाव लागेल. वर्षातील चार महिने वगळता लोकांना या नाल्यातून जीव मुठीत घेऊन ये-जा करत प्रवास करावा लागतो. ईटीव्हीचे प्रतिनिधीदेखील अतिशय परिश्रम करत पोलिसांच्या मदतीने कसे बसे गावाजवळ पोहोचली. १ किमीचा खंडतर रस्ता ओलांडत गावात कुणी तरी आलंय, हे पाहून गावातील आदिवासी बांधव एकत्र आले असून लोकांच्या चेहऱ्यावर हे हास्य बऱ्याच दिवसा नंतर पाहायला मिळाले. याला कारणही तसेच होते. गावकऱ्यांना प्रथमच दिवाळी निमित्त मिळालेली सेवा भावी संस्थांची साथ, नागपुरातील माउली फाउंडेशन सनराईज स्कुल आणि मैत्री परिवार, लॉयनश क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागिरकांना दिवाळी निमित्त फराळ आणि कपड्यांचे वितरण करण्यात आले.
या कडूझरी गावात २०० च्या जवळपास लोक रहात असून या गावातील लोकांना आपला उदर निर्वाह करण्याकरिता शेती शिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दिवाळी असो की दसरा प्रत्येक सण गावकरी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतात हेच जाजाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतची टीम पोहचली. या कडूझरी गावात कडूझरी गाव हे अंत्यत संवेदनशील नक्षलग्रस्त भागात असून गावाला जायला साधा रास्ता नसुन तसेच नाल्यावर पूल नसल्याने मागील चार वर्षात या गावातील मुलांना लग्नाकरिता इतर गावातील लोक आपल्या मुली सुद्धा देण्यास तयार होत नसल्याची माहिती गावातील महिलांनी दिली. मात्र, हे गाव अतिशय घनदाट जंगलात असून या ठिकाणी पोलीस गावकऱ्यांच्या संपर्कात सतत राहत असल्याने नक्षलवाद्यांचा त्रास गावकऱ्यांना होत नाही. मात्र, गावातील रस्ता आणि नाला हा गावकऱ्यांना श्राप असून नेते मंडळी देखील गावात कधीही फिरकत नाहीत, हे मात्र विशेष आहे.
नागपुरातील अशा सेवा भावी संस्थाप्रमाणे इतर सुजाण नागरिकांनी देखील दिवाळीच्या फटाक्यांमध्ये पैसे न उडवता ग्रामीण भागातील जनतेच्या आनंदात सहभाग घेतला. दिवाळीची अनुभुती अशा आदिवासी नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना देखील दिवाळी सारख्या सणाचा आनंद घेता येईल.