ETV Bharat / state

नक्षल्यांनी लपवून ठेवलेले डिटोनेटर जप्त, अज्ञात नक्षल्यांविरोधात गुन्हा दाखल

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागनडोह परिसरात नक्षल्यांनी लपवून ठेवलेले डिटोनेटर पोलिसांनी जप्त केले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुका नक्षलग्रस्त असून, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने या परिसरात नेहमी नक्षल कारवाया सुरू असतात.

Detonate seized in Arjuni Morgaon
नक्षल्यांनी लपवून ठेवलेले डिटोनेटर जप्त
author img

By

Published : Dec 11, 2020, 8:52 PM IST

गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागनडोह परिसरात नक्षल्यांनी लपवून ठेवलेले डिटोनेटर पोलिसांनी जप्त केले आहेत. अर्जुनी मोरगाव तालुका नक्षलग्रस्त असून, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने या परिसरात नेहमी नक्षल कारवाया सुरू असतात. नक्षल्यांचे नमसुबे उधळून लावून, नक्षल चळवळीचा बिमोड करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पोलीसांनी नक्षल्यांनी लपवून ठेवलेले डिटोनेटर गुरुवारी जप्त केले.

गुरुवारी १० डिसेंबरला सशस्त्र दूरक्षेत्र भरनोलीचे पोलीसपथक जंगलात गस्तीवर होते. दरम्यान त्यांना नागऩडोह मयानघाट जंगलात पाच डिटोनेटर आढळून आले. घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी डिटोनेटर ठेवले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हे डिटोनेटर पोलिसांनी जप्त केले असून, पोलिस उपनिरीक्षक अनील टार्फे यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी अज्ञात नक्षल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नुकताच दोन दिवस आधी नक्षल सप्ताह संपला असून, या दरम्यान कोणत्याच प्रकारची नक्षली कारवाई आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.