गोंदिया- तिरोडा पोलीस ठाण्याअंतर्गत येत आसलेल्या एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका युवाकाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाला बाहेर काढले. रिषभ करोशिया(१९) असे मृत युवाकाचे नाव आहे.
विहिरीत मृतदेह असल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी विहिरीतून कुजलेले मृतदेह बाहेर काढले व त्याला उत्तरीय तपासणीसाठी ग्रमीण रुग्णालयात पाठविले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. सदर मृतदेह तिरोडा शहरातीलच रिषभ करोशिया या १९ वर्षीय युवकाचा असल्याचे समजले. दरम्यान युवकाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे डॉक्टरांचा अवहाल आल्यावरच कळणार आहे. पोलीस दोन्ही प्रकारे तपास करीत असल्याचे तिरोडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- अल्पवयीन खून प्रकरण; कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांचा कँडल मार्च