ETV Bharat / state

चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा वैनगंगा नदीत सापडला मृतदेह

author img

By

Published : Feb 23, 2020, 3:11 PM IST

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात आढळून आला आहे. निरोज राजकुमार वासनिक (वय 23) असे मृत तरुणाचे नाव असून तो तालुक्यातील खडबंदा येथील रहिवासी आहे.

gondia
वैनगंगा नदीत आढळला 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह

गोंदिया - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात आढळून आला आहे. निरोज राजकुमार वासनिक (वय 23) असे मृत तरुणाचे नाव असून तो तालुक्यातील खडबंदा येथील रहिवासी आहे. रविवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील वांगी गावाजवळील तुमसर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीरीचे बांधकाम करण्यात येत आहे. या विहिरीत निरोजचा मृतदेह मासेमारी करणाऱ्या लोकांना तरंगतांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा - कत्तलखान्यात जाणाऱ्या दोन ट्रकमधून ४६ जनावरांची सुटका, २० लाखांचा माल जप्त

या घटनेची माहिती मिळताच सिहोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्याजवळ आयटीआयमध्ये शिकत असलेले ओळखपत्र सापडले आहे. निरोज हा आपल्या मोठ्या भावासोबत रोजगाराच्या निमित्ताने नागपुरला वास्तव्यास राहत होता. रोजगारासोबतच त्याने नागपूर येथे आयटीआय येथे प्रशिक्षणही घेत होता. चार दिवसांपासून नागपूर येथे भाड्याने राहत असलेला निरोज हा बेपत्ता होता.

हेही वाचा - गोंदियात मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक जागीच ठार १२ जखमी

यासंबंधी धंतोली पोलीस स्टेशन नागपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यातच निरोजचे मृतदेह आढळून आल्याने त्याची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.