ETV Bharat / state

Ek Din Cycle Ke Nam : युवकांनी केला गोंदिया ते छत्तीसगढ 'असा' सायकलप्रवास - Ek Din Cycle Ke Nam

छत्तीसगड राज्यातील डोंगरगड माँ बम्लेश्वरी धाम येथे गोंदिया येथील 45 युवक सायकलने जाणार आहेत. गोंदियाचे जिल्ह्याचे शान असलेल्या सारस पक्षी नामशेष होत आहे. याच हेतूने सायकल संडे ग्रुपने 'एक दिन सायकल के नाम' हे उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक रविवारला सकाळी एक ते दीड तास ते १५ ते २० किलोमीटर सायकल चालवत आहेत.

cycling team
cycling team
author img

By

Published : Feb 13, 2022, 5:39 PM IST

गोंदिया :- गोंदियातील काही युव मंडळीं 'एक दिन सायकल के नाम' हा उपक्रम वर्ष २०१७ पासून सुरु करत आहे. प्रत्येक आठवड्याच्या रविवारी १५ ते २० किलो मीटर सायकल चालवत मुक्त व निरोगी आरोग्याचा संदेश देण्याचे काम हे युवक मंडळी करतात. प्रदूषणमुक्तीचा हाच संदेश पोहोचण्यासाठी मातृ पितृ दिवसानिमित्त गोंदिया ते छत्तीसगड हे अंतर सायकलने पार करणार आहेत.

व्हीडीयो

छत्तीसगड राज्यातील डोंगरगड माँ बम्लेश्वरी धाम येथे गोंदिया येथील 45 युवक सायकलने जाणार आहेत. गोंदिया जिल्ह्याची शान असलेल्या सारस पक्षी नामशेष होत आहे. सायकल संडे ग्रुपने 'एक दिन सायकल के नाम' हे उपक्रम सुरू आहे. प्रत्येक रविवारला सकाळी एक ते दीड तास ते १५ ते २० किलोमीटर सायकल चालवत आहेत.

युवकांनी केली हजारो किमीची यात्रा

याच अभियानातील दोन युवकांनी अमन व शांती, निरोगी आरोग्य, प्रदूषण मुक्त भारताचा संदेश घेऊन हजारो किमीची यात्रा केली. ते वाघा बॉर्डर, जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचले. आता हाच संदेश घेऊन युवक १३ फेबुवारीला सकाळी ५ वाजता जयस्थंभ चौक येथून सायकल यात्रेला सुरवात केली आहे. हे अंतर सायकलस्वार पार करत डोंगरगडला पोहचणार आहे. आमगाव येथे सायकलिंग ग्रुपचे स्वागत अजय खेतान मित्र परिवार व आमगाव तालुका पत्रकार संघाद्वारे करण्यात आले. तर सालेकसा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनीही स्वागत केले.

cycling team
सायकल ग्रुप

सहभागी झालेले सायकलिस्ट
या सायकल स्वारीत मंजू कटरे, रवी सपाटे, पुरूषोत्तम मोदी, विजय येडे, साहिल खटवानी, शिवम पटले, निकीन कोल्हेटकर, शिव भांडारकर, पियुष हेरोडे, राकेश पेंढारकर, हितेश चौधरी, अजितकुमार शेनमारे, श्रध्दा यादव, दीपाली वाढई, भारती लाडे, आशिष पटले, उमेश माधवानी, निखील बहेकार, भुमि वेगड, कल्याणी गाडेकर, यासह इतर युवक सहभागी झाले होते.

हेही वाचा - Bhujbal vs Patil : 'जोशी भविष्य सांगायचे, पाटील कधीपासून सांगू लागले?' छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.