ETV Bharat / state

व्यापाऱ्यांनो कोरोना चाचणी करा, अन्यथा महामारी संपेपर्यंत दुकान होऊ शकते सील - gondia corona news

गोंदिया जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण, येथील व्यापारी, दुकान मालक व कर्मचाऱ्यांना दर 15 दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून त्याचा अहवाल दुकानात ठेवणे गरजेचे आहे. असे न झाल्यान पहिल्यांचा प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनाकाळ संपेपर्यंत दुकान सील करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 17, 2021, 6:58 PM IST

Updated : Jun 17, 2021, 7:18 PM IST

गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा पूर्वीप्रमाणे सुरू झालेला आहे. अशात दिवसभरात कित्येक नागरिकांच्या संपर्कात येऊन तेथूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी ‘सुपर स्प्रेडर्स’ ठरणाऱ्या व्यापाऱ्यांवर गोंदिया नगर परिषदेने लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यासाठी नगर परिषदेने आता व्यापाऱ्यांना दर 15 दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांना दुकानात निगेटिव्ह अहवाल ठेवावा लागणार आहे, असे न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

बोलताना मुख्याधिकारी

कोरोनावर मात करण्यासाठी तोंडावर मास्क, नियमीत हात स्वच्छ धुणे तसेच शारीरीक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिक या नियमांचे पालन करत असून त्यांना हे सहज शक्यही आहे. मात्र, व्यापाऱ्यांना दिवसभरात कित्येक नागरिकांचा सामना करावा लागत असून, अशात व्यापारी बाधित होऊ शकतात. त्यांच्यापासून अन्य नागरिक बाधित होऊ शकतात. कित्येक ठिकाणी असे घडले असून यामुळेच व्यापाऱ्यांना ‘सुपर स्प्रेडर्स’ म्हटले जाते. अशात या ‘सुपर स्प्रेडर्स’वर नियंत्रण मिळवता आल्यास कोरोनाचा प्रादुर्भावही आटोक्यात आणणे शक्य आहे. यासाठी आता गोंदिया नगर परिषदेने शहरातील व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. व्यापाऱ्यांपासून अन्य नागरिकांत कोरोनाचा प्रसार होऊ नये. यासाठी नगरपरिषदेने व्यापाऱ्यांसाठी नगरपरिषदेत आरटीपीसीआर चाचणीची सोय केली आहे. येथे व्यापाऱ्यांना दर 15 दिवसांनी त्यांची चाचणी करावयाची आहे. एवढेच नव्हे तर, या व्यापाऱ्यांना त्यांचा निगेटिव्ह अहवाल दुकानात ठेवायचा आहे. असे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असे आदेशच नगर परिषदेने काढले आहेत.

दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास कोविड संपेपर्यंत दुकाने सील

दर 15 दिवसात आरटीपीसीआर चाचणी व्यापारी, कर्मचारी व दुकान मालकालाही बंधनकारक आहे. चाचणी झालेली नसेल तर त्याला एक हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असून दुसऱ्यांदा आढळल्यास कोरोना संपणार नाही तोपर्यंत त्या व्यापाऱ्याचे दुकान सील करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा - गोंदिया रेल्वे स्थानकावर ९ लाख रुपयाची रोकड जप्त

Last Updated : Jun 17, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.