गोंदिया - गेल्या 38 दिवसांपासून गोंदिया शहर कोरोनामुक्त असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु, मंगळवारी (19 मे) दोन तर गुरुवारी (21 मे) 20 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात एकूण 22 रुग्ण सध्या पाॅझिटिव्ह सापडले आहेत. गुरुवारी पाॅझिटिव्ह आलेले बहुतांश रुग्ण हे मुंबई, पुणे येथून आलेले आहेत. यामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील 5, अर्जुनी मोरगाव व गोंदिया तालुक्यातील रुग्णांचाही समावेश आहे.
शहरातील गणेशनगर परिसरातील एका तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचारांनंतर त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठविण्यात आले.