गोंदिया - कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे. नाना पटोले हे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पटोले यांनी याची सुरुवात आपल्या जन्मभूमी गोंदियातून केली आहे. ते आज कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून प्रथमच गोंदियात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाचा आढावा घेण्यासाठ हा दौरा करत असल्याचे नानांनी सांगितले.
'उद्या १ हजार पेट्रोल पंपासमोर आंदोलन करणार'
दुसरीकडे पेट्रोल व डिझेलचे दर मोदी सरकार वाढवत आहे आणि देशातील लोकांचे खिशे कापत आहेत. या कोरोना परिस्थितीमध्ये लोक आर्थिक अडचणीत आले असताना कुठलीही काळजी न करता महागाई आकाशाला टेकवण्याचे काम मोदी सरकारच्या वतीने सुरु आहे. नेमक्या किती पैशामध्ये पेट्रोल व डिझेल केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळतो. त्याचा किती टॅक्स केंद्राच्या वतीने लावले जातो, त्याची सगळी माहिती आम्ही लोकांना अवगत करून देणार आहोत. उद्या आम्ही कॉग्रेसच्या वतीने राज्यातील २८८ विधानसभा क्षेत्रातील १ हजार पेट्रोल पंप समोर मोदी सरकारच्या १०० पार संदर्भात वित्त सेल्फी काढत आंदोलन करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या १० जून महाराष्ट्रात होणारी एमबीबीएसची होणारी परीक्षा ऑफलाइन होणार आहे. या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाची RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते, याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी 16 जूनपासून कोल्हापुरातून सुरुवात होणार - संभाजीराजे