गोंदिया - ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील ३२ दिवसात कोरोना रुग्ण न आढळल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यात सर्व दुकाने उघडी करण्याची परवानगी दिली असून, आता परत त्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७पर्यंत सुरू राहणार आहे.
आठवड्यातले सातही दिवस हे सर्व दुकाने सुरू राहणार आहे. मात्र, यात मद्यविक्री दुकानांच्या वेळापत्रकात मात्र बदल केला गेला नसून, पूर्वीप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे ग्रीन झोन असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अटी आणि शर्थीनुसार सर्व दुकाने निश्चितवेळी उघडता येणार आहेत.