ETV Bharat / state

पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरण : पोलीस निरीक्षकासह तीन शिपायांवर गुन्हा दाखल - amgaon custodial death case

२० मे रोजी आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत 3 चोरट्यांनी दरोडा घातला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करीत २१ मे रोजी आमगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यापैकी एका आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याने, गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षकासह, सहायक पोलीस निरीक्षक तसेच तीन पोलीस शिपायांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.

case filed against a police personnel in Custodial death of accused
पोलीस कोठडी आरोपी मृत्यू प्रकरण:पोलीस निरीक्षकासह सहायक पोलीस निरीक्षक, तीन शिपायांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : May 28, 2021, 9:07 PM IST

गोंदिया - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस कोठडीतच आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी, गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षकासह, सहायक पोलीस निरीक्षक तसेच तीन पोलीस शिपायांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून एक सहायक पोलीस निरीक्षक हा पसार झाला आहे.

पोलीस कोठडी आरोपी मृत्यू प्रकरण:पोलीस निरीक्षकासह सहायक पोलीस निरीक्षक, तीन शिपायांवर गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण?
२० मे रोजी आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत 3 चोरटयांनी दरोडा घातला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपींना अटक करीत २१ मे रोजी आमगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. माझ्या भावाला बेदम मारहाण केली असून त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या बहिणीने केला होता. दरम्यान, मृत राजकुमार याच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे उघडकीस आले असून, अमानुषपणे मारहाण केल्याचे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे.

एकाच वेळी एकाच पोलीस ठाण्यातील पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

पहिल्यांदाच एकाच वेळेला एकाच पोलीस ठाण्यात इतक्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे यांच्या विरोधात कलम ३०२, ३३०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हा पसार असून त्याचा शोध सुरु आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.