ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव, 16 दिवसात 151 पक्षांचा मृत्यू - गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्यात ८ ते २२ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. काही पक्षांचे एच-५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Bird flu outbreak in Gondia district
Bird flu outbreak in Gondia district
author img

By

Published : Jan 24, 2021, 2:46 AM IST

Updated : Jan 24, 2021, 3:01 AM IST

गोंदिया - महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात ८ ते २२ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी पुणे प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल विभागातर्फे कळविण्यात आला आहे. गोंदिया तालुक्यातील बिर्सी विमानतळ क्षेत्रातील एक कावळा, गोरेगाव तालुक्यातील कु-हाडी येथील एक बगळा व नागझिरा अभयारण्य क्षेत्रातील एक पोपट प्राथमिक चाचणीत एच-५ करीता पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर हे नमुने पुढील खात्रीकरीता राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत.

बर्ड फ्ल्यूविषयी माहिती देताना पशूवैद्यकीय अधिकारी

या क्षेत्रांमध्ये सर्वेक्षणाचे काम चालु आहे. बिर्सी, कु-हाडी व नागझिरा क्षेत्रांसह कुक्कुट पक्ष्यांमध्ये मृत्यू झालेल्या गोंदिया तालुक्यातील एकोडी व गोरेगाव तालुक्यातील निंबा या संवेदनशील भागात सतर्कता क्षेत्र म्हणुन घोषित करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडुन करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात द्यावी, अशा सुचना पशुसंवर्धन विभागाने केल्या आहेत.

विमानतळ परिसरात चार मृत पक्षी -

सध्या सर्वत्र बर्ड फ्ल्यूची दहशत असुन, गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ परिसरात मंगळवारी चार मृत पक्षी आढळले. विमानतळ प्राधिकरणाचे याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन चारही मृत पक्ष्यांचे अवशेष तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. बिरसी विमानतळ परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या तीन पक्ष्यांमध्ये दोन कबुतर आणि दोन घुबडाच्या पिल्लांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चार पाच दिवसांपुर्वीच याच भागात दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असुन, त्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यानंतर पुन्हा चार पक्षी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

या चारही पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आत्ताच सांगता येणार आहे. मृत पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल.

Last Updated : Jan 24, 2021, 3:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.