ETV Bharat / state

गोंदियात रुग्णवाहिकेने दिली ऑटोरिक्षाला धडक; पाच प्रवाशी जखमी - गोंदिया अपघात बातमी

अशोक भय्यालाल भोंगाडे असे रिक्षाचालकाचे नाव आहे. अशोक प्रवासी घेऊन खमारीवरुन आमगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, ठाणा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली.

रुग्णवाहिकेने दिली ऑटोरिक्षाला धडक
author img

By

Published : Nov 9, 2019, 8:18 PM IST

गोंदिया - येथील ठाणागाव ते दहेगाव जवळ आज (शनिवारी) सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका व ऑटोरिक्षा यांचा अपघात झाला. अपघातात खमारी येथील ५ जण जखमी झाले आहे. गोंदियावरुन आमगावला प्रवासी घेऊन जाणाऱ्या प्रवासी ऑटो रिक्षाला समोरुन येणाऱ्या रुग्णवाहिकेने धडक दिली आहे.

रुग्णवाहिकेने दिली ऑटोरिक्षाला धडक

हेही वाचा- Ayodhya Judgment: 'निकाल जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका, राम-रहीम भक्तीपेक्षा भारतभक्तीची ही वेळ - पंतप्रधान

जखमींना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले आहे. अशोक भय्यालाल भोंगाडे (वय ५० वर्षे) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याने आमगाव येथे पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. अशोक प्रवासी घेऊन खमारीवरुन आमगावच्या दिशेने जात होता. दरम्यान, ठाणा गावाजवळ भरधाव वेगाने येणारी मारोती सुझुकी इक्वो (३५ के -५२१४) या रुग्णवाहिकेने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. रुग्णवाहिकेचा चालक मोबाईलवर बोलत होता, असे अशोक यांचे म्हणणे आहे. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकाने पळ काढला. या अपघातात ऑटोरिक्षातील प्रवाशी जखमी झाले आहेत. देवराम चुटे, राधिका मेंढे, बंसत बांगड, देवाजी बागडे व गंगा भांडारकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 09-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_09.nov.19_ambulances nad auto accident_7204243
एम्बुलेंसनी दिली ऑटोरिक्षा ला धडक, 
चालक घटनास्थळ वरून पसार 
Anchor:- आमगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या ठाणागाव ते दहेगाव गावाच्या जवळ आज  सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका  व ऑटोरिक्षा  यामध्ये  झालेल्या अपघातात खमारी येथील ५ जण जखमी झाले आहे. गोंदिया वरून आमगावला प्रवासी घेउन जाणा-या प्रवासी ऑटो रिक्षाला विरुध्द दिशेने येणा-या एम्बुलेंसनी धडक मारली. या अपघातात प्रवासी जखमी झाले असून उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले आहे.ऑटोरिक्षा चालक अशोक भय्यालाल भोंगाडे ५० वर्षे राहणार सेलटेक्स कॉलोनी गोंदिया याने पोलिस स्टेशन आमगाव येथे दिलेल्या तक्रारीवरून नेहमी प्रमाणे प्रवासी घेउन गोंदिया ते खमारी ला ऑटोरिक्षा क्र. एमएच ३५ - ३००८ ने येत असत. परंतु त्यांना गोंदिया ते आमगाव प्रवासी मिळाल्यामुळे खमारी वरून आमगावच्या दिशेने निघाले असता ठाणा गावाजवळ भरगाव वेगाने येत असलेली एम्बुलेन्स मारोती सुझुकी इक्वो गाडी क्र. ३५ के - ५२१४ नी ऑटोरिक्षा ला जबर धडक दिली. एम्बुलेन्सचा चालक मोबाईलवर बोलत एम्बुलेन्स भरगाव वेगाने चालवीत होता. ऑटोरिक्षाला धडक दिल्यानंतर एम्बुलेन्सचा चालक घटनास्थळ वरून पळ काढला. या अपघातात ऑटोरिक्षातील प्रवाशी जखमी झाले असून जखमींमध्ये देवराम चुटे, राधिका मेंढे,  बंसत बांगड, देवाजी बागडे व गंगा भांडारकर हे सर्व राहणार खमारी यांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी गोंदियाला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु असुन आमगाव पोलीस स्टेशन मध्ये गुना नोंद केला असुन समोरील तपास सुरु आहे.Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.