गोंदिया - केंद्र सरकारने येथील लोकांना पाच वर्षांपासून फक्त लॉलीपॉप देवून ठेवले आहे. त्यांनी येथील लोकांचे घर बांधण्याचे स्वप्न भंग करण्याचे काम केले आहे. त्यामुळे येथील लोक कर्जबाजारी झाले आहेत. यात लोकांना घरकुलाची मंजूरी मिळाली, पण पैसे मिळलेले नाही. देवरी येथे अनेकाना घरकुल मंजूर झाले असून केंद्राकडून पैसे न मिळाल्याने कॉंग्रेसतर्फे देवरी नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
'घरकुल' या योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून लाभार्थीला त्यांच्या खात्यात पैसा मिळतो. मात्र, राज्य सरकारचा पहिला हप्ता आला आणि लाभार्थींनी आपल्या घरांच्या कामाला सुरवात केली. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप एकही पैसा न मिळाल्याने देवरी येथील लाभार्थींची कामे रखडली असल्याने केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे पाठवावे, तसेच ज्यांना जमिनीचे पट्टे नाही. त्यामुळे त्यांना घरकुल मिळत नाही. त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाने पहिला हप्ता दिला;परंतु जे केंद्र सरकारकडून दीड लाख रूपयांचा थकित हफ्ता मिळालेला पाहिजे होता. तो वारंवार मागणी व पाठपुरावा करून सुद्धा अजूनपर्यंत केंद्र सरकारकडून घरकुल लाभार्थ्यांना थकित निधी मिळालेला नाही. या मागण्या घेऊन देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कोरोटे आणि तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने देवरी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना थकित रक्कम व पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे त्वरित देण्याची मागणी घेऊन देवरी नगरपंचायत कार्यालयावर धड़क मोर्चा काढला.