ETV Bharat / state

गोंदियात तीन हजाराची लाच घेताना तलाठ्यास अटक - गोंदिया

तक्रारदाराच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. आरोपी देवेंद्र नेवारे यांनी तक्रारदाराकडून ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी उर्वरित ८ हजारांची मागणी केली. त्याचा पहिला हप्ता म्हणून ३ हजार रुपये लाच घेत असताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात अटक केली.

आरोपी देवेंद्र नेवारे
author img

By

Published : Feb 23, 2019, 1:14 PM IST

गोंदिया - तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे १९ फेब्रुवारीला ट्रॅक्टरने मातीची वाहतूक करणाऱ्या तक्रारदाराला तलाठी देवेंद्र टोलीराम नेवारे यांनी पकडले होते. तक्रारदाराने तलाठी देवेंद्र नेवारे यांना ट्रॅक्टर सोडण्याबाबत विनंती केली. मात्र, तलाठी यांनी तक्रारदाराच्या ट्रॅक्टरवर वर्षभर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

अँटी करप्शन ब्युरो ऑफिस

तक्रारदाराने देवेंद्र नेवारे यांना नाईलाजाने २ हजार रूपये दिले व उर्वरित ८ हजार रूपये नंतर आणून देतो असे सांगितले. मात्र २० फेब्रुवारीला तलाठी यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन उर्वरित ८ हजाराची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तलाठ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. आरोपी देवेंद्र नेवारे यांनी तक्रारदाराकडून ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी उर्वरित ८ हजारांची मागणी केली. त्याचा पहिला हप्ता म्हणून ३ हजार रूपये लाच घेत असताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात अटक केली. आरोपीविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 22-02-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- GONDIA_22.FEB_ACB
तीन हजाराची लाच घेताना तलाठ्यास अटक
Anchor:- तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे १९ फेब्रुवारीला ट्रॅक्टरने मातीची वाहतुक करीत असतांना देवेंन्द्र टोलीराम नेवारे, तलाठी, यांनी पकडले होते. त्यावेळी तक्रारदाराने तलाठी देवेंद्र टोलीराम नेवारे यांना ट्रॅक्टर सोडण्याबाबत विनंती केली असता तलाठी यांनी तक्रारदाराच्या ट्रॅक्टरवर वर्षभर कोणतीही कार्यवाही न करण्याकरीता १०,००० रूपयांचा लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराने तलाठी देवेंद्र टोलीराम नेवारे यांना नाईलाजाने २,००० रूपये दिले व उर्वरित ८००० रूपयांची व्यवस्था करून नंतर आणुन देतो असे सांगितले. मात्र २० फेब्रुवारी रोजी तलाठी यांनी तक्रारदरा यांच्या राहत्या घरी जावुन तक्रारदारास उर्वरित ८००० रूपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रार दाराला यावेळी लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तलाठी च्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचुन कार्यवाही करण्यासाठी आयोजन केले असता देवेंद्र टोलीराम नेवारे, तलाठी, सेजगाव, साझा क्र. ४ ता. तिरोडा, जि. गोंदिया यांनी तक्रारदाराकडुन ट्रॅक्टरवर कोणतीही कार्यवाही न करण्यासाठी उर्वरित ८००० रूपयांची मागणी करून पहिला हप्ता म्हणुन ३००० रूपये लाच रक्कम स्विकारली असता लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगे हात अटक केली असुन आरोपी विरुद्ध गंगाझरी पोलिसस्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेBody:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.