ETV Bharat / state

चार महिन्यांच्या मुलीच्या अन्ननलिकेत निघाले ६ खडे; डॉक्टरांसह सर्वच हैराण - girl in Gondia district

गोंदिया येथे चार महिन्यांच्या मुलीच्या अन्न नलिकेत चार ते पाच एमएमचे ६ खडे निघाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. चार महिन्यांच्या मुलीच्या गळ्यात हे चार ते पाच खडे कसे गेले असा प्रश्न डॉक्तरांनाही पडला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या लटोरी गावात ही घटना उघडीस आली आहे.

चार महिन्यांच्या मुलीच्या अन्ननलिकेत निघाले ६ दगड

author img

By

Published : Oct 22, 2022, 4:17 PM IST

Updated : Oct 22, 2022, 7:04 PM IST

गोंदिया - गोंदिया चार महिन्याच्या मुलीच्या अन्न नलिकेत चार ते पाच एमएमचे ६ खडे निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार महिन्यांच्या मुलीच्या गळ्यात हे चार ते पाच खडे कसे गेले असा प्रश्न डॉक्तरांना देखील पडला आहे. मात्र, हे खरे आहे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या लटोरी गावात ही घटना उघडीस आली आहे.

डॉक्टरांची प्रतिक्रिया

गोंदिया जिल्याच्या सालेकसा तालुका अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील लटोरी या गावातील एका चार महिण्याच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत ६ खडे अडकले असल्याचे समोर आले. या चुमुकलीला खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने तिच्या पालकांनी तिला गोंदियातील एका डॉक्टरकडे उपचारासाठी घेऊन गेले असता, मुलीचे एक्सरे व सीट स्कॅन काढले तेव्हा हे सगळे समोर आले आहे.

गोंदियातील डॉक्टरांनी या मुलीची शस्त्रक्रिया करून हे खडे काढण्याचे ठरवले असता. डॉ. विकास जैन यांच्या रुग्णालयात या चिमुकलीला दाखल करण्यात आले आहे. डॉ. विकास जैन आणि त्यांचे इतर सहकारी डॉ. यांनी या चार महिन्यांच्या मुलीची सशत्रक्रिया करून अन्ननलिकेत अडलेले ६ खडे ऑपरेशन करत बाहेर काढले आहे.

या घटनेबद्दल डॉक्टरही अवाक झाले आहेत. हे खडे बाहेर निघताच सर्वांनाच एक धक्का बसला. सध्या या मुलीची स्वस्थ आहे.
तर, चार महिन्याची मुलगी साधा भिस्केटसुद्धा खाऊ शकत नसताना, तिच्या अन्ननिकेत हे ६ खडे मिळाल्याने डॉक्टरांनी या संदर्भात सालेकसा पोलिसांना माहिती दिले आहे. दरम्यान, या मुलीची हत्या करण्यासाठी तिच्या तोंडात कुणी खडे तर घातले नाही ना याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Last Updated : Oct 22, 2022, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.