ETV Bharat / state

गोंदियातील ७ गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार - लोकसभा

प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर दाखले मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल ७ गावातील ३ हजारहून अधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

गोंदियातील ७ गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
author img

By

Published : Apr 1, 2019, 8:01 PM IST

गोंदिया - नक्षलवाद्यांनी गोंदिया जिल्ह्यातील मिसपिरी या गावची २०११ मध्ये ग्रामपंचायत जाळली होती. या आगीत नागरिकांचे दाखले व जुने दस्तावेज जळून खाक झाले होते. या घटनेला ८ वर्षे झाली आहेत. तरीही प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर दाखले मिळण्यास अडचण होत आहे. त्यामुळे मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल ७ गावातील ३ हजारहून अधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात आता नक्षलवादी हल्ले कमी झाले आहेत. मात्र, भुतकाळात घडलेल्या घटना येथील नागरिकांच्या भविष्यावर विपरीत परिणाम करत आहेत. जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या मिसपिरी या अतिदुर्गम व १०० टक्के नक्षलग्रस्त असलेल्या गावात ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षल्यांकडून ग्रामपंचायतीला आग लावण्यात आली होती. या आगीत या गावासह आजूबाजूच्या ७ गावातील ग्रामस्थांचे आवश्यक दस्तावेज व इतर सामग्री जळून खाक झाली होती.

गोंदियातील ७ गावांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

घटनेनंतर याबाबतची सूचना ग्रामस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यांना व जनप्रतिनिधींना दिली होती. मात्र, आज तब्बल ८ वर्षानंतरही नागरिकांचे आवश्यक दस्तावेज तसेच इतर माहिती ग्रामपंचायतीमध्ये नसल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. आगीत नागरिकांच्या उपयोगी पडणारे जन्म-मृत्यू नोंदवही तसेच इतर महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून नष्ट झाले. ग्रामस्थांच्या मागणीवरून अंगणवाडी शाळेचे दाखले व आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करून व ग्रामसभेची मंजुरी घेऊन २८ डिसेंबर २०१५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुंबई मंत्रालयात पाठविण्यात आले. परंतु त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 01-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-MH_GONDIA_01_APR_19_LOK ELC BAHISKAR VILLAGE 3500 VOTER
गोंदिया जिल्ह्यातील ७ गावातील ३पेक्षा जास्त मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत लोकप्रतिनिधींना गावबंधी
Anchor :- नक्षल तर्फे गोंदिया जिल्ह्यातील मिसपिरी या गावातील ग्रामपंचायत मध्ये नक्षलवाद्यनि सण २०११ रोजी जाळण्यात आली होती त्यामुळे या जाळपोळ मध्ये नागरिकांचे दाखले व जुने दस्तावेज जळून खाक झाले होते मात्र आज ८ वर्ष लोटून सुद्धा प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर महत्त्वपूर्ण दाखले मिळण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे आज अखेर अतिदुर्गम दुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त असलेल्या या मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल ७ गावातील तीन हजार च्या वर ग्रामस्थांनी एकमताने या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच समोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचे म्हटले आहे.

VO :- गोंदिया जिल्ह्यात आज नक्षली चळवळी कमी झाल्या असल्या तरी भूतकाळात घडलेल्या घटना आज येथील ग्रामस्थांचा भविष्यावर विपरीत परिणाम टाकत आहे जिल्ह्यातील देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मिसपिरी या अतिदुर्गम व १०० टक्के नक्षलग्रस्त असलेल्या गावात ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षली तर्फे ग्रामपंचायत ला आग लावण्यात आली होती त्यामुळे या आगीत या गावाशिवाय आजूबाजूचा सात गावातील ग्रामस्थांचे आवश्यक दस्तावेज व इतर सामुग्री जळून खाक झाली होती तर या घटनेनंतर या बाबत ची सूचना ग्रामस्थांनी त्या त्या वेळी स्थानिक अधिकाऱ्यांना व जनप्रतिनिधि ना देण्यात आली मात्र आज तब्बल ८ वर्ष लोटून सुद्धा नागरिकांचे आवश्यक दस्तावेज तसेच इतर माहिती ग्रामपंचायत ला नसल्यामुळे अनेक अडचणी येथील ग्रामस्थांना येत आहे, मिसपिरी येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी जाळून टाकल्यानंतर नागरिकांच्या उपयोगात येणारे जन्म-मृत्यू नोंदवही तसेच इतर महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून नष्ट झाले. ग्रामस्थांच्या मागणीवरून अंगणवाडी शाळेचे दाखल खारीज व आरोग्य विभागाचे नोंदणीनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करून व ग्रामसभेची मंजुरी घेऊन २८ डिसेंबर २०१५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुंबई मंत्रालयात पाठविण्यात आले. परंतु त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.

BYTE :- शरद कुमरे ( सरपंच )
BYTE :- जीवन सलामे ( ग्रामस्थ )
BYTE :- नंदा वालदे ( ग्रामस्थ )

VO :- तर आज राज्य व केंद्र शासन मतदान हे किती आवश्यक यावर जनजागरण करीत असले तरीही आज या गावातील ग्रामस्थांनी एकमताने घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन सुद्धा हादरून घेतले आहे या सात गावातील तब्बल तीन हजार हुन अधिक ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून प्रचार सोबतच जनप्रतिनिधींना गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे.

BYTE :- विजय बुरडे (तहसीलदार, देवरी)
01 टू 01 :- संजय पुराम (देवरी विधानसभा, आमदार)

VO :- आज शासन ग्रामीण तसेच नक्षलग्रस्त भागात झालेल्या विकास कामाचा गाजावाजा करीत असले तरीही, आज मिसपिरी हे गाव विकास पासून किती दूर आहे हे या घटनेवरून लक्षात येईल आज तब्बल ८ वर्ष लोटून सुद्धा यांची मुख्य समस्या अजूनही जैसे थेच असल्यामुळे, त्यांना होत असलेल्या अडचणी अधिकाधिक वाढत आहे त्यामुळे आतातरी प्रशासन या दुर्गम भागात लक्ष केंद्रित करणार काय हाच खरा प्रश्न आहेBody:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.