ETV Bharat / state

दुर्गा देवी विसर्जनाकरिता गेलेल्या २७ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू - गोंदिया न्यूज

गोंदियाच्या मक्कीटोला गावात, दुर्गा देवी विसर्जना करिता गेलेल्या २७ वर्षीय युवकाच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुर्गेश वट्टी असे मृताचे नाव आहे.

27-year old young boy drowned in pond at gondia district
दुर्गा देवी विसर्जनाकरिता गेलेल्या २७ वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू
author img

By

Published : Oct 27, 2020, 9:53 AM IST

गोंदिया - दुर्गा देवी विसर्जना करिता गेलेल्या २७ वर्षीय युवकाच्या शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मक्कीटोला गावात घडली. दुर्गेश वट्टी असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मक्कीटोला गावामध्ये काल (सोमवार ता. २६) नवयुवक दुर्गा उत्सव समितीच्या वतीने दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी निघालेल्या या मिरवणूकीत दुर्गेश वट्टी हा देखील सहभागी झाला होता. मूर्तीचे शेततळ्यात विजर्सन करण्यात येत असताना दुर्गेश याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला.

दरम्यान, घटनेची माहिती आमगाव पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा शोध घेतला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

हेही वाचा - गोंदियात मंदिरे सुरू करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे ढोल बजाओ आंदोलनासह महाआरती

हेही वाचा - क्षुल्लक कारणावरून सुनेकडून सासूची गळा दाबून हत्या, गोंदियातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.