ETV Bharat / state

'त्या' लिपिक युवतीच्या हत्येप्रकरणी विवाहित प्रियकरास अटक - गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी

या हत्येप्रकरणी चंद्रप्रभा यांचा विवाहित प्रियकर नामदेव दागोजी भोगे (वय 38) याला पोटेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

'त्या' लिपिक युवतीच्या हत्येप्रकरणी विवाहित प्रियकरास अटक
author img

By

Published : Jul 25, 2019, 5:47 PM IST

गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (वय 32 रा. कारवाफा) या युवतीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना 17 जुलैला समोर आली होती. या हत्येप्रकरणी तिचा विवाहित प्रियकर नामदेव दागोजी भोगे (वय 38) याला पोटेगाव पोलिसांनी अटक केली आहे. तो कोरची तालुक्यातील बेतकाठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

चंद्रप्रभा ही नोकरीच्या निमित्ताने गडचिरोलीत एकटीच राहत होती. 15 जुलैला कार्यालयात आल्यानंतर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक आल्याचे सांगत कार्यालयातून ती बाहेर पडली. मात्र, ती परत आलीच नाही. त्यानंतर 2 दिवस ती बेपत्ता होती. दरम्यान, 17 जुलैला तिचा मृतदेह नवरगाव गावाजवळील पोहार नाल्यात आढळून आला होता. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता.

ज्या नाल्यात चंद्रप्रभाचा मृतदेह आढळून आला त्या नाल्यापासून काही अंतरावर दुसऱ्या एका नाल्यात तिचे दुचाकी वाहन आढळून आले होते. यावरून प्रेम प्रकरणातून तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना होता. या संशयावरून शिक्षक असलेल्या नामदेव भोगे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील रहिवासी असून त्याला एक मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या तो 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

चौकशीसाठी गेलेल्या पोलीस अधिकार्‍यासोबत खुर्चीवरून वाद-

या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाचे गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत. दरम्यान, 24 जुलैला बुधवारी पोटेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक घटनेच्या तपासासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात पोहोचले. तेव्हा प्रकल्प संचालक उपस्थित नव्हते. ज्या दिवशी चंद्रप्रभा नातेवाईक आल्याचे सांगत सायंकाळच्या सुमारास कार्यालयातून निघून गेली, त्या दिवशीचे व्हिडिओ फुटेज बघायचे असल्याने पोलिसांनी परवानगी घेतली. प्रकल्प संचालकाच्या कक्षामध्ये संगणकावर पोलीस उपनिरीक्षक फुटेज बघत असताना प्रकल्प संचालक कार्यालयात हजर झाले. तेव्हा खुर्ची ओढून बसल्याच्या कारणावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकल्प संचालकांनी तर थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याची धमकीही पोलिसांना दिली. मात्र, दोन्ही अधिकारी काही वेळानंतर शांत झाले. घडलेल्या या प्रकाराची आज गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांकडून चर्चा ऐकायला मिळत होती.

Intro:'त्या' लिपिक युवतीच्या हत्येप्रकरणी विवाहित प्रियकरास अटक

गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (वय 32) रा. कारवाफा या युवतीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची घटना 17 जुलैला समोर आली होती. या हत्येप्रकरणी तिचा विवाहित प्रियकर नामदेव दागोजी भोगे (वय 38) याला पोटेगाव पोलिसांनी अटक केली आहे. तो कोरची तालुक्यातील बेतकाठी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.Body:चंद्रप्रभा ही नोकरीच्या निमित्ताने गडचिरोलीत एकटीच राहत होती. 15 जुलैला कार्यालयात आल्यानंतर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नातेवाईक आल्याचे सांगत कार्यालयातून ती बाहेर पडली. मात्र ती परत आलीच नाही. त्यानंतर दोन दिवस ती बेपत्ता होती. दरम्यान 17 जुलैला तिचा मृतदेह नवरगाव गावाजवळील पोहार नाल्यात आढळून आला होता. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला होता.

ज्या नाल्यात चंद्रप्रभाचा मृतदेह आढळून आला त्या नाल्यापासून काही अंतरावर दुसऱ्या एका नाल्यात तिचे दुचाकी वाहन आढळून आले होते. यावरून प्रेम प्रकरणातून तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना होता. या संशयावरून शिक्षक असलेल्या नामदेव भोगे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील रहिवासी असून त्याला एक मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या तो पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

चौकट
चौकशीसाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यासोबत खुर्चीवरून वाद

या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाचे गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत. दरम्यान 24 जुलै बुधवारी पोटेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक घटनेच्या तपासासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात पोहोचले. तेव्हा प्रकल्प संचालक उपस्थित नव्हते. ज्या दिवशी चंद्रप्रभा नातेवाईक आल्याचे सांगत सायंकाळच्या सुमारास कार्यालयातून निघून गेली, त्या दिवशीचे व्हिडिओ फुटेज बघायचे असल्याने पोलिसांनी परवानगी घेतली. प्रकल्प संचालकाच्या कक्षामध्ये संगणकावर पोलीस उपनिरीक्षक फुटेज बघत असताना प्रकल्प संचालक कार्यालयात हजर झाले. तेव्हा खुर्ची ओढून बसल्याच्या कारणावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. प्रकल्प संचालकांनी तर थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याची धमकीही पोलिसांना दिली. मात्र दोन्ही अधिकारी मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याने काही वेळानंतर शांत झाले. घडलेल्या या प्रकाराची आज गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांकडून चर्चा ऐकायला मिळत होती.Conclusion:सोबत मृतक युवतीचा पासपोर्ट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.