ETV Bharat / state

गडचिरोलीत महिला नक्षलीला अटक; 6 लाखांच होते बक्षीस - gadchiroli crime news

नक्षलवाद्यांच्या भामरागड एरिया कमिटीची सदस्य असलेल्या महिला नक्षलीला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक असे तिचे नाव असून तिच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते.

author img

By

Published : Dec 7, 2019, 11:52 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या भामरागड एरिया कमिटीची सदस्य असलेल्या महिला नक्षलीला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक असे तिचे नाव असून तिच्यावर 6 लाखांचे बक्षीस होते.

हेही वाचा - अल्पवयीन मुलीला फूस लावून तरुणाकडून स्नॅक्स सेंटरमध्ये लैंगिक शोषण

पार्वती ऊर्फ सुशीला ताडगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मडवेली गावातली रहिवासी असून ती नक्षली बिच्छूची पत्नी आहे. 2006 पासून ती बाल नक्षली म्हणून दलममध्ये सहभागी झाली होती. 2008 ते 2010 पर्यंत नर्मदाक्काची ती अंगरक्षक होती. दरम्यान, 2010 ते 2012 पर्यंत जांबिया गट्टा दलममध्ये कमांडो रामकोसोबत ती महिला संघटनेचे काम पाहत होती. त्यानंतर 2012 ते 2014 पर्यंत भामरागड एलओसीची उपकमांडर म्हणूनही काम केले. सद्यस्थितीत एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.

भामरागडमधील नैनवाडीतील डूंगा कोमटी मडावी यांच्या हत्येच्या आरोपावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शुक्रवारी तिला अटक केली. दरम्यान, शनिवारी तिला न्यायालयात उपस्थित केले असता तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पार्वतीवर 6 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि तिच्यावर जिल्ह्यात 24 हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली अटक हे पोलिसांचे यश मानले जात आहे.

Intro:6 लाखांचे बक्षीस असलेली नक्षली पार्वती सडमेकला अटक

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भामरागड एरीया कमिटीची सदस्य असलेली पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक हिला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अटक केली. तिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर केलेली अटक हे गडचिरोली पोलिसांचे यश मानले जात आहे.Body:पार्वती ऊर्फ सुशीला ताडगाव पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या मडवेली गावची रहिवासी असून ती नक्षली बिच्छूची पत्नी आहे. 2006 पासून ती बाल नक्षली म्हणून दलम मध्ये सामील झाली. 2008 ते 2010 पर्यंत नर्मदाक्काची अंगरक्षक होती. 2010 ते 12 पर्यंत जांबिया गट्टा दलममध्ये कमांडो रामको सोबत महिला संघटनेचे काम पाहत होती. 2012 ते 2014 मध्ये की भामरागड एलओसीची उपकमांडर म्हणून कार्यरत होती. तर सद्यस्थितीत एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.

गडचिरोली पोलिसांनी शुक्रवारी तिला अटक केली असून, भामरागड पोलीस स्टेशन येथे भामरागड तालुक्यातील नैनवाडी निवासी डूंगा कोमटी मडावी यांच्या हत्येच्या आरोपावरून गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी तिला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने तिला सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पार्वतीवर पोलिसांनी सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिचेवर जिल्ह्यात 24 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. Conclusion:नक्षलवाद्यांचा फाईल फोटो वापरावं
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.