ETV Bharat / state

गडचिरोलीत महिलांनी दारुचे अड्डे केले उद्ध्वस्त, दारुविक्रेत्यांवर कारवाईची मागणी - WINE

जिल्ह्यातील राजपूरपॅच येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी नदीलगत असलेले दारूविक्रेत्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. नदीलगत असलेल्या परिसरात जमिनीखाली पुरून ठेवलेले ४५ ड्रम गुळाचा सडवा, २ पोती गुळ आणि तुरटी शोधून काढत महिलांनी ती नष्ट केली.

गडचिरोलीत महिलांनी दारुचे अड्डे केले उद्ध्वस्त
author img

By

Published : Apr 14, 2019, 12:14 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील राजपूरपॅच येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी नदीलगत असलेले दारूविक्रेत्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. नदीलगत असलेल्या परिसरात जमिनीखाली पुरून ठेवलेले ४५ ड्रम गुळाचा सडवा, २ पोती गुळ आणि तुरटी शोधून काढत महिलांनी ती नष्ट केली.

राजपूरपॅचमध्ये गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. परिसरातील बोरी, विठ्ठलवाडा, आष्टी, चौरंगपल्ली, लदाम यासह इतरही गावातील लोक येथे दारू पिण्यासाठी येतात. परिणामी येथील महिला त्रस्त झाल्या आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. संघटनेमार्फत विक्रेत्यांना वारंवार सुचना दिल्या जात आहेत. पण विक्रेते ऐकायला तयार नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.

गडचिरोलीत महिलांनी दारुचे अड्डे केले उद्ध्वस्त

शुक्रवारी तालुका मुक्तिपथ चमूने महिलांसोबत बैठक घेतली. यावेळी महिलांनी दारूमुळे होत असलेला त्रास आणि अडचणी मांडल्या. गावात उघड दारू मिळत असून दारूचे अड्डेही माहिती असल्याचे महिलांनी सांगितले. त्यानुसार, दारूभट्ट्या असलेल्या टीना नदीच्या परिसरात जाऊन शोधमोहीम सुरु केली असता, जमिनीखाली प्लास्टिकच्या ड्राममध्ये पुरून ठेवलेला तब्बल ४५ ड्राम गुळसडवा आढळून आला. सोबतच दोन पोती गुळ आणि तुरटीही सापडली. हा सर्व मुद्देमाल आणि साहित्य नष्ट करण्यात आले. या कृतीत महिला आणि गावातील काही युवक सहभागी झाले होते. पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली. अशाच अहिंसक कृती करून दारू नष्ट करण्याचा निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण गावकरी सहकार्य करीत नसल्याने गावात दारूची विक्री होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गावात सतत धाडसत्र राबवून विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Intro:महिलांनी केला ४५ ड्राम गुळसडवा नष्ट : दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम

गडचिरोली : अहेरी येथून २० किमी अंतरावर असलेल्या राजपूरपॅच येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी शुक्रवारी दिना नदीलगत असलेले दारूविक्रेत्यांचे अड्डे उद्दध्वस्त केले. नदीलगत जंगल परिसरात जमिनीखाली पुरून ठेवलेला ४५ ड्राम गुळाचा सडवा, दोन पोती गुळ आणि तुरटी शोधून काढत महिलांनी ती नष्ट केली.Body:राजपूरपॅच हे तालुक्यातील मोठे गाव आहे. गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री या गावात होते. परिसरातील बोरी, विठ्ठलवाडा, आष्टी, चौरंगपल्ली, लदाम यासह इतरही गावातील लोक येथे दारू पिण्यासाठी येतात. परिणामी येथील महिला त्रस्त झाल्या आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. संघटनेमार्फत विक्रेत्यांना वारंवार सुचना दिल्या जात आहेत. पण विक्रेते ऐकायला तयार नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहे.

शुक्रवारी तालुका मुक्तिपथ चमूने महिलांसोबत बैठक घेतली. यावेळी महिलांनी दारूमुळे होत असलेला त्रास आणि अडचणी मांडल्या. गावात उघड दारू मिळत असून दारूचे अड्डेही माहिती असल्याचे महिलांनी सांगितले. त्यानुसार दारूभट्ट्या असलेल्या टीना नदीच्या परिसरात जाऊन शोधमोहीम सुरु केली असता जमिनीखाली प्लास्टिकच्या ड्राममध्ये पुरून ठेवलेला तब्बल ४५ ड्राम गुळसडवा आढळून आला. सोबतच दोन पोती गुळ आणि तुरटीही सापडली. हा सर्व मुद्देमाल आणि साहित्य नष्ट करण्यात आले. या अहिंसक कृतीत महिला आणि गावातील काही युवक सहभागी झाले होते. पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली. अशाच अहिंसक कृती करून दारू नष्ट करण्याचा निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण गावकरी सहकार्य करीत नसल्याने गावात दारूची विक्री होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गावात सतत धाडसत्र राबवून विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला सातत्याने करीत आहेत.Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.