गडचिरोली - शेतात काम करीत असलेल्या महिलेवर एका युवकाने अत्याचार केला. ही घटना शनिवारीसकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा येथील शेतात घडली. सुभाष हनुमंत देशमुख (वय २५ रा. चांभार्डा) असे आरोपीचे नाव असून, आरमोरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पीडित महिलेने घटनेची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आरमोरी न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे घटनेचा तपास करीत आहेत.