ETV Bharat / state

गडचिरोली : आष्टी पेपर मिल कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी - गडचिरोली बिबट्याचा हल्ला बातमी

इल्लूर पेपर कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली. बबिता दिलीप मंडल (45) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

gadchiroli leopard attack newsgadchiroli leopard attack news
gadchiroli leopard attack news
author img

By

Published : Sep 30, 2021, 8:49 AM IST

गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील इल्लूर पेपर कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली. बबिता दिलीप मंडल (45) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी तिला चंद्रपूरला पाठवण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्लात महिला गंभीर जखमी -

बबिता मंडल या सकाळी 8च्या सुमारास घरामागे भांडे घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर मुलाने व शेजारच्या युवकांनी लागलीच धाव घेतली. त्यांनी बिबट्याच्या तावडीतून बबिता यांना सोडवले व बिबट्याला तेथून हूसकावून लावले. बिबट्याच्या या हल्ल्यात बबिता यांच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी -

दरम्यान, या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाकडे या नरभक्षक बिबट्याला वारंवार जेरबंद करण्याची मागणी करूनही वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या हल्ल्यास वनविभागाचा दुर्लक्षित पणा कारणीभूत असल्याचे आरोप करत लवकरात लवकर या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

राज्यात इतर ठिकाणीही बिबट्याच्या हल्लात वाढ -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्लात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या आरे कॉलनीतील 4 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आरे मध्यवर्ती कार्यालय विसावा येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्याने पाठीमागून येत एका महिलेवर जोरदार हल्ला केला. हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. तर चंद्रपूरच्या जुनोना गावात एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या चिमुकलीला वाचवण्यासाठी आईने बिबट्यावरच झडप घेतली होती. त्यामुळे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आता राज्यातील विविध भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- आरेत बिबट्याची दहशत : धाडसी महिलेने बिबट्याचा हल्ला लावला परतवून; महिला जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.