ETV Bharat / state

निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी - गडचिरोली विधानसभा मतदारसंघ

विधानसभा निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट असून, मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रक व बॅनरच्या माध्यमातून केले आहे. मात्र, नक्षलवाद्यांना न जुमानता गावकऱ्यांनी बॅनर व पत्रकाची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या.

निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी
author img

By

Published : Oct 18, 2019, 8:02 PM IST

गडचिरोली - विधानसभा निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट असून, मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रक व बॅनरच्या माध्यमातून केले आहे. मात्र, नक्षलवाद्यांना न जुमानता गावकऱ्यांनी बॅनर व पत्रकाची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या.

निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली नक्षलवाद्यांच्या बॅनरची होळी

उपविभाग भामरागड अंतर्गत येणा-या लाहेरी हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवाद्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बॅनर व पोस्टर्सव्दारे ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.

परंतु, नक्षलवाद्यांनी केलेल्या या आवाहनाला गावक-यांनी सडेतोड उत्तर दिले असून, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे एकत्र येऊन लोकशाहीवर विश्वास दाखवत नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर्स व पोस्टर्सची होळी केली आहे. नक्षलवादी स्वत:च्या फायदयासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत असून, आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे गावकऱयांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील 200 ते 300 नागरिक उपस्थित होते.

नक्षलवाद्यांचा विरोध करत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मोठया प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.

Intro:निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट; गावकऱ्यांनी केली बॅनरची होळी

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीवर नक्षलवाद्यांचे सावट असून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रक व बॅनरच्या माध्यमातून केले आहे. मात्र नक्षलवाद्यांना न जुमानता गावकऱ्यांनी बॅनर व पत्रकाची होळी करीत नक्षलवादी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.Body:उपविभाग भामरागड अंतर्गत येणा-या लाहेरी हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवादयांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बॅनर व पोस्टर्स व्दारे ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.

नक्षलवादयांनी केलेल्या या आवाहनास गावक-यांनी सडेतोड उत्तर दिले असुन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे एकत्र येत लोकशाहीवर विश्वास दाखवत नक्षलवादयांनी लावलेले बॅनर्स व पोस्टर्सची होळी केली. यावेळी पंचक्रोशीतील २०० ते ३०० नागरिक उपस्थित होते. गावक-यांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

नक्षलवादी स्वत:च्या फायदयासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत असुन आम्ही आमच्या भागाच्या विकासाकरीता मतदान प्रक्रियेत सहभागी होवून लोकशाही बळकट करण्यासाठी व आमच्या भविष्यासाठी मतदान करणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. नक्षलवादयांचा विरोध करीत लोकशाहीच्या बळकटीसाठी मोठया प्रमाणावर घराबाहेर पडुन मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.