ETV Bharat / state

अवकाळी पावसामुळे वन व वन्यप्रण्यांना मिळाली संजीवनी

यावर्षी तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे जंगलातील ओलापणामुळे वणवे लागले तरी विस्तार होत नाहीत. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे. तसेच या पावसामुळे पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या तेंदू पत्याला पालवी फुटली आहे. त्यामुळे वेळेवर पाने तोडायला सुरुवात होत नसेल तर किडे लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेंदू झाडाला पालवी फुटली
तेंदू झाडाला पालवी फुटली
author img

By

Published : May 9, 2021, 3:51 PM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यात अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका वनातील मोहफुल, आमराई, चारोळी सह इतर पिकांना बसत आहे. तसेच पावसामुळे जंगलातील गवत हिरवे झाले असून पालापचोळा ओला झाला आहे. त्यामुळे जंगलात लागलेल्या आगीचा विस्तार होणार नाही. वन व वन्यप्राण्यांना संजीवनी मिळाली आहे. तसेच पुढील आठवड्यात सुरु होणारा तेंदू झाडाला उत्तम दर्जाची पाने दिसून येत आहेत.

मार्च, एप्रिल, मे महिन्यात अनेक कारणास्तव जंगलात सर्वाधिक आगी लागतात. वनव्यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न केले जातात. आगीमुळे ग्रामीण भागात मोहफुल वेचण्यासाठी अडचण निर्माण होते. तसेच झाडेही जळून खाक होतात. वन्यप्राण्यांचे नुकसान होते. मात्र यावर्षी तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे जंगलातील ओलापणामुळे वणवे लागले तरी विस्तार होत नाहीत. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान टाळण्यास मदत झाली आहे. तसेच या पावसामुळे पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या तेंदू पत्याला पालवी फुटली आहे. त्यामुळे वेळेवर पाने तोडायला सुरुवात होत नसेल तर किडे लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.