ETV Bharat / state

पोलीस-नक्षल चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती हद्दीत नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत. ते घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या चकमकीनंतर नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे
author img

By

Published : Sep 15, 2019, 10:18 AM IST

Updated : Sep 15, 2019, 8:21 PM IST

गडचिरोली- सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज सकाळी (रविवार) गडचिरोलीत नरकसा जंगल परिसरात सी-६० चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आणखी ४ ते ५ माओवादी जखमी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

चकमकीत दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत.

उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती हद्दीत नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत. ते घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मौजा नरकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवण्यास सुरुवात केली. यावेळी सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या २० ते २५ नक्षलवाद्यांनी जवांनाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ ही चकमक चालली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळून गेले.

gadchiroli

चकमकीनंतर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असता दोन जहाल माओवादी मृत अवस्थेत मिळुन आले. यामध्ये एक पुरुष व एक महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. पुरुष मृत नक्षलवाद्याचे नाव लालस उर्फ शांताराम देवराव गावडे (रा. मुरगांव, ता. धानोरा जि. गडचिरोली) असे आहे. तो कंपनी क्रमांक ४ मध्ये प्लाटुन पार्टी कमेटी मेंबर म्हणून कार्यरत होता. मृत महिला नक्षलवाद्याचे नाव समिला (रा. बस्तर एरिया छत्तीसगड) आहे. ती कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य होती. दोघांवर सरकारने प्रत्येकी ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

या चकमकीनंतर नक्षलवाद्यांच्या दैनंदिनी वापराचे साहित्य, एक कार्बाईन, एक बारा बोअर रायफल, राउंड, भुसुरुंग स्फोट घडवण्याचे साहीत्य, दुर्बिण, वॉकीटॉकी व ट्रान्झिस्टर मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. या चकमकीत आणखी ४ ते ५ माओवादी जखमी असण्याची शक्यता आहे.

सी-६० कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Intro:Body:

national marathi

Conclusion:
Last Updated : Sep 15, 2019, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.