ETV Bharat / state

गडचिरोलीत 12 जणांना बचाव पथकाने पुरातून सुखरूप काढले बाहेर

मंगळवारी सकाळी टाटा सुमो गाडीने जात असलेले प्रवाशी पुराच्या पाण्यात पुलावर अडकले. पुराच्या पाण्यात अडकल्याने  बारा जणांना पोलीस व महसूल विभागाने करून सुखरूप बाहेर काढले.

12 जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून पुरातून सुखरूप काढले
author img

By

Published : Aug 13, 2019, 6:41 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी टाटा सुमो गाडीने जात असलेले प्रवाशी पुराच्या पाण्यात पुलावर अडकले. पुराच्या पाण्यात अडकल्याने बारा जणांना पोलीस व महसूल विभागाने करून सुखरूप बाहेर काढले. पुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख दहा मार्ग सद्यस्थितीत बंद असून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या 'सर्च शोधग्राम' प्रकल्पालाही पाण्याने वेढले आहे.

12 जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून पुरातून सुखरूप काढले

गेल्या चोवीस तासात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 126 मिमी पाऊस झाला. गडचिरोली शहरालगतची कठाणी व पोटफोडी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे दोन्ही नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे नाल्याच्या पाण्यात 12 प्रवासी असलेली टाटा सुमो गाडी पुराच्या पाण्यात पुलावर अडकली. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने येथे जिल्हा आपत्ती निवारण दलाचे पथक तत्काळ दाखल झाले. दोन महिला व 8 पुरुषांसह बारा जणांना स्थानिक पोलीस व महसूल विभागाच्या प्रयत्नाने सुखरुप बाहेर काढण्यात आले.

Intro:रेस्क्यू करून 12 जणांना पुरातून सुखरूप काढले : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा 'सर्च शोधग्राम' प्रकल्प पाण्याखाली

गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान आज सकाळी टाटा सुमोने जात असलेले प्रवासी पुराच्या पाण्यात पुलावर अडकल्याने बारा जणांना पोलीस व महसूल विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप बाहेर काढले. पुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख दहा मार्ग सद्यस्थितीत बंद असून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या 'सर्च शोधग्राम' प्रकल्पालाही पाण्याने वेढले आहे.Body:गेल्या चोवीस तासात एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे गडचिरोली शहरालगतची कठाणी व पोटफोडी नदी दुथडी वाहत असून दोन्ही नद्यांना पूर आला. दरम्यान गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे नाल्याच्या पाण्यात 12 प्रवासी असलेले टाटा सुमो वाहन अडकले. पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने येथे जिल्हा आपत्ती निवारण दलाची चमू तात्काळ दाखल झाली. अडकलेल्या दोन महिला व 8 पुरुषांना स्थानिक पोलिस व महसूल विभागाच्या प्रयत्नाने सुखरुप बाहेर काढण्यात आले.

जिल्ह्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती झाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांचा सर्च रुग्णालय पाण्याखाली गेले असून डॉक्टरांच्या वसाहतीला पूर्णता पाण्याने वेढले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या मुसळधार पावसाने अनेक नाल्यांना पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी, कुरखेडा-वैरागड, मानापुर-देलनवाडी, वैरागड-रांगी, येरकड-मालेवाडा, गोगाव-दिभणा, आरमोरी-रांगी, तळोधी-घोट हे प्रमुख दहा मार्ग बंद झाले आहेत.

Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.