ETV Bharat / state

जनावरांची वाहतूक करताना ट्रक उलटला; २५ जनावरांचा मृत्यू - गडचिरोली बातमी

जनावरे घेवून जाणारा ट्रक उलटल्याने २५ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात जामनारा-गहाणेटोला गावाजवळील वळणावर झाला. कोरची तालुक्यातील बोरी येथून नागपुरच्या दिशेने जात होता.

अपघातग्रस्त ट्रक
अपघातग्रस्त ट्रक
author img

By

Published : Oct 23, 2020, 10:59 AM IST

गडचिरोली - जनावरे घेवून जाणारा ट्रक उलटल्याने २५ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात जामनारा-गहाणेटोला गावाजवळील वळणावर झाला. कोरची तालुक्यातील बोरी येथून नागपुरच्या दिशेने ट्रक जात होता. घटनास्थळाहून ट्रकचालक पसार झाला आहे.

अपघातग्रस्त ट्रक
अपघातग्रस्त ट्रक

गोंदिया जिल्ह्यातील देवरीमार्गे नागपूर व गडचिरोलीमार्गे हैदराबादला गाई, म्हशी व बैलांची कत्तलीसाठी वाहतूक केली जाते असा आरोप होत आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री काही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर बेळगाव पोलिसांनी दोन ट्रक पकडले. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा बोरी येथून ३० गाई व म्हशी घेऊन (एमएच ३०-एबी १४१९) क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता. परंतु जामनारा-गहाणेटोला गावाजवळच्या वळणावर हा ट्रक उलटला. त्यातील २५ जनावरे दगावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.