ETV Bharat / state

गडचिरोलीत राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव, 20 विद्यापीठातील विद्यार्थी करणार कलेचे प्रदर्शन

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने इंद्रधनुष्य २०१९ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे सोपवली आहे. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २० विद्यापीठांमधील तरुणाई आपल्या कलेचे सप्तरंग विद्यापीठाच्या प्रांगणात उधळणार आहे.

author img

By

Published : Nov 29, 2019, 4:58 PM IST

Updated : Aug 30, 2022, 11:00 AM IST

Gondwana university, gadchiroli
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात १७ व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबरला विद्यापीठाचे कुलपती तथा महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी दिली. या महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने इंद्रधनुष्य २०१९ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे सोपवली आहे. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २० विद्यापीठांमधील तरुणाई आपल्या कलेचे आविष्कार सादर करणार आहेत. त्यामध्ये संगीत, नाटक, साहित्य, नृत्य आणि ललित कला या पाच प्रकारांतील २६ कलांचा समावेश आहे. त्यासाठी ४० जणांचा चमू १ डिसेंबरला गडचिरोलीत दाखल होणार आहे.

हेही वाचा रायगड संवर्धनासाठी २० कोटी निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय

तर २ डिसेंबरला सकाळी ११ वाजता महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर आणि प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी उपस्थित राहतील. यानंतर ६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता समारोपीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी सिने कलावंत मकरंद अनासपुरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असेही डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.

हेही वाचा बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन, इंधन पुरवठा ठप्प

पत्रकार परिषदेला प्र कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, प्रा.डॉ. शशीकांत गेडाम, प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, प्रा.डॉ.धनराज खानोरकर, डॉ.प्रिया गेडाम, डॉ.विनायक शिंदे, डॉ.प्रीती पाटील, डॉ.दुबे उपस्थित होते.

Last Updated : Aug 30, 2022, 11:00 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.