ETV Bharat / state

गडचिरोलीमध्ये समाजसेवक डॉ. बंग दाम्पत्याने घेतली कोरोना लस

author img

By

Published : Jan 23, 2021, 5:27 PM IST

भारतात कोविडची साथ चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे. त्यामुळे आपल्या बरोबर इतरांचेही संरक्षण होईल, असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले.

गडचिरोली
गडचिरोली

गडचिरोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग कोविड लसीकरणासाठी आले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समवेत रांगेत राहून लस घेतली. उपस्थित इतर आरोग्य कर्मचारी-अधिकाऱ्यांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी डॉ. बंग यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना जस-जसा आपला नंबर येईल तस-तसी लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले. या लसीकरणावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

गडचिरोली

लसीकरणाला घाबरू नये - डॉ. अभय बंग

भारतात कोविडची साथ चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे. त्यामुळे आपल्या बरोबर इतरांचेही संरक्षण होईल, असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. तर डॉ. राणी बंग यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या असून कोविड लसीकरणाबाबत आमचा चांगला अनुभव आहे. कोणीही लसीबाबत गैरसमज करून घेऊ नये. या ठिकाणी सर्व कर्मचारी अनुभवी आहेत. कोणीही लसीकरणाला घाबरू नये. भारतात लसीकरण खरेतर इतर देशांच्या तुलनेत लवकर होत आहे. याचा लाभ सर्व लोकांनी संसर्ग थांबविण्यासाठी घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.

आरोग्य कर्मचाऱ्यांना लस -

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना सद्या लसीकरणाच्या पहिल्या टप्यात कोविड लस टोचली जात आहे. आज डॉ. बंग कुटुंबीयांचा नंबर आल्यानंतर त्यांनी लसीकरणाला हजेरी लावली. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविडविषयी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सध्या लस टोचली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.